
दक्षिणेची अभिनेत्री नित्या मेननने बाल कलाकार म्हणून आपल्या करियरची सुरुवात केली होती. त्यानंतर Ala Modalaindi चित्रपटातून हिरॉईन म्हणून तिला फेम मिळाला. नित्या मेनन आज नैसर्गिक अभिनयासाठी ओळखली जाते. पण एकवेळ तिला लुक्सवरुन बरच ऐकावं लागलेलं.

"सुरुवातीला लुक्सवरुन माझ्यावर इंडस्ट्रीमध्ये टीका झाली होती" इंडस्ट्रीमध्ये फिट होण्यासाठी काही गोष्टी बदलायला सांगितलेल्या का? असा प्रश्न तिला वाचरला. इंडिया टुडेशी बोलताना नित्याने हे खुलासे केले.

"त्यांना माझ्या केसांची अडचण होती. मी माझा पहिला चित्रपट केला, तेव्हा ते बोलले की, हे कसे केस आहेत?. आज सगळ्यांना कर्ली म्हणजे कुरळे केस हवे आहेत. पण त्यावेळी असं नव्हतं"

"त्यावेळी लोक बोलायचे तू खूप छोटी आहेस, मोटी आहेस. तुझे आयब्रो मोठे आहेत. केस लांब आहेत. प्रत्येक गोष्ट खटकायची" पण माझ्याकडे त्यावेळी चॉईस नव्हता. मी आहे, त्यापेक्षा वेगळी बनू शकत नव्हती.

"तुम्ही कोणाच्या लुक्सवर कसे टीका करु शकता?. हा खूप खालच्या दर्जाचा विचार झाला. पण लोक असं करतात" अशा शब्दात नित्या मेननने तिच्या वेदना व्यक्त केल्या.