Samantha Meet CM Vijay : ‘त्यासाठी हिम्मत लागते’, मुख्यमंत्री विजय यांना भेटल्यानंतर समांथाची रोखठोक प्रतिक्रिया

Samantha Meet CM Vijay : अभिनेते थलपती विजय आज तामिळनाडूचे मुख्यमंत्री आहेत. पण त्याआधी हिरो म्हणून अभिनेत्री समांथा रुथ प्रभू सोबत त्यांनी अनेक चित्रपटांमध्ये काम केलं आहे. काथथी, थेरी आणि मर्सल हे विजय आणि समांथा जोडीचे हिट चित्रपट आहेत. बुधवारी चेन्नईमध्ये समांथाने मुख्यमंत्री विजय यांची भेट घेतली.

| Updated on: Jun 18, 2026 | 8:39 AM
1 / 5
समांथाने विजय यांची भेट घेऊन तामिळनाडू विधानसभा निवडणुकीत मिळवलेल्या घवघवीत यशाबद्दल त्यांचं अभिनंदन केलं. त्याचवेळी ती हे सुद्धा बोलली की, विजय हे फक्त पडद्यावरचा हिरो बनण्यासाठी बनलेले नाहीत. तिने विजय यांच्या सोबत भेटीचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत.

समांथाने विजय यांची भेट घेऊन तामिळनाडू विधानसभा निवडणुकीत मिळवलेल्या घवघवीत यशाबद्दल त्यांचं अभिनंदन केलं. त्याचवेळी ती हे सुद्धा बोलली की, विजय हे फक्त पडद्यावरचा हिरो बनण्यासाठी बनलेले नाहीत. तिने विजय यांच्या सोबत भेटीचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत.

2 / 5

मला नेहमी असं वाटायचं की, विजय सर हे फक्त पडद्यावरचा हिरो बनण्यासाठी बनलेले नाहीत. त्यांची ऊर्जा, उपस्थिती आणि ज्या पद्धतीने लोक त्यांना प्रतिसाद देतात ते पाहून असं वाटतं की, ते काहीतरी मोठ्या गोष्टीसाठी बनले आहेत असं समांथा म्हणाली.

3 / 5

विजय यांच्या राजकीय प्रवेशाबद्दलही समांथा बोलली. चित्रपटातलं यशस्वी करिअर मागे सोडून नवीन आव्हान स्वीकारण्यासाठी हिम्मत लागते, ते पाहिल्यानंतर विजय यांच्याकडून प्रेरणा मिळते असं समांथाने सांगितलं.

4 / 5

संपूर्णपणे नव्या क्षेत्रात प्रवेश करण्यासाठी जी हिम्मत लागेत, ते पाहून मला प्रेरणा मिळते. ज्यात तुम्ही मास्टर आहात ते मागे सोडून नवीन काहीतरी करायचं, त्यात बरचं काही पणाला लागलेलं असतं. असं नाही की ते सोपं आहे म्हणून पण तुमचा तुमच्यावर बदल घडवण्याचा असलेला विश्वास महत्वाचा आहे, असं समांथा विजय यांच्याबद्दल म्हणाली.

5 / 5

समांथा यावेळी जनसेवेच्या उद्देशाबद्दलही बोलली. प्रत्येकजण आयुष्यात अशा एक टप्प्यावर पोहोचतो, जिथे तुम्ही तुमच्या पलीकडे समाजासाठी योगदान देण्याचा विचार केला पाहिजे असं समांथा बोलली.

Follow Us