
ज्या अभिनेत्रीच्या खासगी आयुष्याबद्दल चर्चा रंगत आहे, ती अभिनेत्री दाक्षिणात्य सिनेविश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री तृषा कृष्णन आहे. सध्या तृषा कृष्णन तिच्या आगामी ' PS 2 ' सिनेमामुळे चर्चेत आहे. तृषा ३९ वर्षांची असून अद्याप अविवाहित आहे.

तृषा एक प्रसिद्ध मॉडेल देखील आहे. तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. वयाच्या ३९ व्या वर्षी देखील तिचं सौंदर्य अनेक तरुणींना लाजवेल असं आहे.

काही दिवसांपूर्वी अभिनेत्रीला तिच्या लग्नाबद्दल विचारण्याच आलं. तेव्हा अभिनेत्री म्हणाली, 'कामामध्ये व्यस्त असते, म्हणून मला लग्न करुन घटस्फोट घ्यायचा नाही.. माझ्या अनेक मित्रांनी आनंदाने लग्न केलं, पण आता काही जण घटस्फोटाचा विचार करत आहेत.'

पुढे अभिनेत्री म्हणाली, 'नात्यात लोक खूश नसतील तर लग्न कशाला करायचं, मला योग्य व्यक्ती भेटलेली नाही, त्यामुळे मी कधीही लग्नाचा विचार केला नाही. असं देखील अभिनेत्री म्हणाली.

तृषा बाहुबली स्टार राणा डग्गुबतीसोबत रिलेशनशिपमध्ये होती. त्यांच्या नात्याबद्दल खुद्द अभिनेत्रीने एका मुलाखतीत सांगितलं होतं. एवढंच नाही तर, राणाने देखील सर्वांसमोर अभिनेत्रीसोबत असलेल्या नात्याचा स्वीकार केला.

अभिनेत्रीचं नाव फक्त राणा डग्गुबतीसोबत याच्यासोबतच नाही तर सुपरस्टार विजय सेतुपती याच्यासोबत देखील जोडण्यात आलं. पण दोघांनी कधीही त्यांच्या नात्याचा स्वीकार सर्वांसमोर केला नाही.

तृषाने एका उद्योजकासोबत साखरपुडा केला होता, पण त्यांचं नातं फार काळ टिकलं नाही. अखेर त्यांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. आता अभिनेत्री एकटं आयुष्य जगत आहे.