Rajinikanth : विजय यांना बर्थ डे च्या शुभेच्या का दिल्या नाहीत? अखेर रजनीकांत यांनी दिलं उत्तर

Rajinikanth : तामिळनाडूचे मुख्यमंत्री थलपती विजय यांचा वाढदिवस राज्याच्या राजकारणात चर्चेचा विषय बनला आहे. पहिलं तृषा कृष्णनने मेसेज का पोस्ट केला नाही, त्यावरुन अंदाज बांधले जात होते, नंतर रजनीकांत यांचं मौन चर्चेचा विषय बनलं.

| Updated on: Jun 25, 2026 | 9:07 AM
1 / 5
एका स्टारने दुसऱ्या स्टारला बर्थ डे च्या शुभेच्छा देण्यासाठी सोशल मीडियावर पोस्ट न करणं यावरुन चर्चा, तर्क-वितर्कांचा एक नवीन ट्रेंड सुरु झाला आहे. त्यावरुन चाहते मंडळी आपलेच अंदाज लावून मोकळे होते. तामिळनाडूचे मुख्यमंत्री थलपती विजय यांना बर्थ डे च्या शुभेच्छा देणं किंवा न देणं हा सोशल मीडियावर एक मुद्दा बनला आहे.

2 / 5
थलपती विजय यांनी 22 जूनला त्यांचा 52 वा वाढदिवस साजरा केला. या प्रसंगी त्यांना अनेक सेलिब्रिटी, राजकारणी, फिल्म इंडस्ट्रीतील सहकलाकारांनी शुभेच्छा दिल्या. सोशल मीडियावर रजनीकांत हे विजय यांच्या वाढदिवशी काहीच व्यक्त झाले नाहीत. त्यावरुन विविध अंदाज, तर्क-वितर्क वर्तवण्यात आले.

3 / 5
रजनीकांत यांनी जाणीवपूर्वक असं केलं का? वाढदिवसाची मुद्दाम दखल घेतली नाही का? असे प्रश्न काही जण उपस्थित करत होते.  बुधवारी 'धरमन' चित्रपटाच्या टायटल लाँन्चच्यावेळी रजनीकांत यांनी या अफवांना उत्तर दिलं.

4 / 5
चित्रपटाच्या टायटल लॉन्चवेळी रजनीकांत यांनी मीडियाशी संवाद साधला. पत्रकारांनी रजनीकांत यांना विजयच्या बर्थ डे च्या दिवशी कुठली पोस्ट केली नाही, या बद्दल प्रश्न विचारला. रजनीकांत यांनी यावर थेट 'मी त्याला फोन वरुन शुभेच्छा दिल्या' असं सांगितलं.

5 / 5
सार्वजनिक प्लॅटफॉर्म सोशल मीडियावरुन संदेश देण्याऐवजी मी खासगीमध्ये माझ्या शुभेच्छा दिल्या असं सांगून रजनीकांत यांनी या सर्व चर्चांना पूर्णविराम दिला. मी सध्या सार्वजनिक ठिकाणी बोलताना संभाळून बोलतो, कारण मी जे काही बोलतो, त्यावरुन चर्चा,वादविवाद होतात अस रजनीकांत म्हणाले.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us