AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

होणाऱ्या नवऱ्याबद्दल सारा तेंडुलकर हिचा मोठा खुलासा, म्हणाली, तो..

सचिन तेंडुलकर याची मुलगी सारा तेंडुलकर कायमच चर्चेत असते. त्यामध्येच आपल्या होणाऱ्या पतीबद्दल आणि नातेसंबंधांवर सारा अली खान हिने स्पष्ट भूमिका मांडली आहे. पहिल्यांदाच यावर बोलताना सारा तेंडुलकर दिसत आहे. तिने मोठा खुलासा केला.

होणाऱ्या नवऱ्याबद्दल सारा तेंडुलकर हिचा मोठा खुलासा, म्हणाली, तो..
Sara Tendulkar
| Updated on: Aug 11, 2026 | 7:12 AM
Share

भारतीय दिग्गज क्रिकेटर सचिन तेंडुलकर याची लेक सारा तेंडुलकर कायमच चर्चेत असते. सारा तेंडुलकर हिची जबरदस्त अशी फॅन फॉलोइंग बघायला मिळते. सारा तेंडुलकर आणि शुभमन गिल एकमेकांना डेट करत असल्याची तूफान चर्चा रंगताना दिसते. मात्र, यावर सारा तेंडुलकर कधीच भाष्य करताना दिसली नाही. आता पहिल्यांदाच सारा तेंडुलकर हिने तिच्या नातेसंबंधांवर आणि आपल्या होणाऱ्या नवऱ्याबद्दल मोठे विधान केले. मनसोक्त गप्पा मारताना सारा तेंडुलकर दिसली. सारा तेंडुलकर हिने व्होग इंडियाला एक मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये तिने आपल्या आई वडिलांबद्दल होणाऱ्या पतीबद्दल आणि लग्नाबद्दल मोठा खुलासा केला.

सारा तेंडुलकर हिने म्हटले की, माझे आई वडील सचिन तेंडुलकर आणि अंजली तेंडुलकर यांच्या नात्यात एक खेळी मेळीचे वातावरण राहिले आहे. चेष्टा मस्करीने आणि आनंदाने बहरलेले त्यांचे नाते आहे. मी लहानाची मोठी होत असताना मी त्यांचे हे सर्व नाते अगदी जवळून बघितले. त्यामुळे जोडीदाराबाबत माझ्या काही अपेक्षा आहेत. माझे आई वडील इतर कोणत्याही गोष्टीपेक्षा ते खूप चांगले मित्र आहेत.

त्यांच्यात कायमच एक हलकी फुलकी खडाजंगी असते. मला मुळात म्हणजे माझ्या होणाऱ्या जोडीदारासोबत तसेच नाते हवे आहे. सारा तेंडुलकर ही तिच्या आई वडिलांच्या नात्याकडे एक आदर्श नाते म्हणून बघते. आपल्या लग्नाबद्दल आणि आपल्याला पती कसा हवा आणि नाते कसे असावे, याबाबत स्पष्ट बोलताना सारा तेंडुलकर दिसली आहे. सचिन आणि अंजली तेंडुलकर आपले वैयक्तिक आयुष्य प्रसिद्धीपासून दूर ठेवतात.

सारा तेंडुलकर हिने पुढे म्हटले की, फक्त इतरांच्या अपेक्षा किंवा याच ठराविक काळात लग्न करायचे म्हणून लग्न घाई घाईत करण्याची माझी तयारी नाही. तरुण पिढीच्या नातेसंबंधांकडे पाहण्याचे दृष्टिकोन कसे आहेत. यावर बोलताना सारा तेंडुलकर हिने म्हटले की, जेव्हा एखादी गोष्ट योग्य वाटत नाही, तेव्हा त्यातून बाहेर पडणे किंवा संबंध तोडणे जेनजींसाठी सोपे आहे.

मी बऱ्याचदा बघितले आहे की, साखरपुडा झाल्यानंतर ज्यावेळी लग्नाची तयारी सुरू असते, त्यावेळी काहीजण म्हणतात की, मला हे पुढे चालू ठेवण्याची इच्छा नाही. लग्नाअगोदरच यातून बाहेर पडणे चांगले ठरते. साराने पुढे म्हटले की, अगोदरच्या पिढ्यांना आपली भूमिका मांडताना भीती वाटायची. पण आता याउलट चित्र आहे. जेनजींमध्ये तसे दिसत नाही. पहिल्यांदाच यावर बोलताना सारा तेंडुलकर दिसली.

Follow Us
लालबागचा राजा ते साकीनाक्याचा... मुंबईच्या गणपतींची अनोखी कलाकुसर
Ganpati Idol : लालबागचा राजा ते साकीनाक्याचा महाराजा; कुठे 45 अंशात झुकलेली मूर्ती, तर कुठे... मुंबईच्या गणपतींची अनोखी कलाकुसर
गणपतीची आरती मुस्लिम बांधवांनी केली, हिंदू बांधवांनी...
Jalgaon : गणपतीची आरती मुस्लिम बांधवांनी केली, हिंदू बांधवांनी... जळगावात 1970 पासूनची राष्ट्रीय एकात्मतेची अनोखी परंपरा कायम
लालबागचा राजा ते दगडूशेठ हलवाई! मुंबई-पुण्यात विसर्जन मिरवणुकीला
Ganpati Visarjan : लालबागचा राजा ते दगडूशेठ हलवाई! मुंबई-पुण्यात बाप्पाच्या विसर्जन मिरवणुकीला लाखो भाविकांची गर्दी
ऊन-पावसाची पर्वा नाही, रस्त्यांवर भक्तांचा महासागर! बाप्पाला निरोप
Ganpati Visarjan : ऊन-पावसाची पर्वा नाही, रस्त्यांवर भक्तांचा महासागर! मुंबई, पुणे, नाशिकमध्ये गणपती बाप्पा मोरयाच्या जयघोषात लाडक्या बाप्पाला निरोप
ही शान कोणाची? लालबागच्या राजाची...श्रॉफ बिल्डिंगजवळ लालबागच्या राजावर
ही शान कोणाची? लालबागच्या राजाची...श्रॉफ बिल्डिंगजवळ लालबागच्या राजावर पुष्पवृष्टी
93 वर्षांची परंपरा, लाखो भक्तांची श्रद्धा... लालबागच्या राजाची मिरवणूक
Lalbaugcha Raja : 93 वर्षांची परंपरा, लाखो भक्तांची श्रद्धा अन्... लालबागच्या राजाची भव्य मिरवणूक बघाच
घोषणा नको, शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे द्या; छावा संघटनेचं आमरण उपोषण
Latur Drought : घोषणा नको, शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे द्या; छावा संघटनेचं आमरण उपोषण
शान कुणाची? लालबागच्या राजाची! जयघोषाने मुंबई दुमदुमली...
Lalbaugcha Raja : शान कुणाची? लालबागच्या राजाची! जयघोषाने मुंबई दुमदुमली...
चिंतामणीच्या मिरवणुकीतील छोट्या गणेशभक्ताचा VIDEO व्हायरल
Chinchpokli Chintamani : ढोल-ताशांच्या गजरात चिमुकला थिरकला! चिंतामणीच्या मिरवणुकीतील छोट्या गणेशभक्ताचा VIDEO व्हायरल
मी जेव्हा जेव्हा सांगतो मी पुन्हा येईल, तेव्हा... फडणवीसांचा तो डायलॉग
Devendra Fadnavis : मी जेव्हा जेव्हा सांगतो मी पुन्हा येईल, तेव्हा मी येतोच! फडणवीसांचा तो जुना डायलॉग पुन्हा चर्चेत