
टीव्ही इंडस्ट्रीमधील प्रसिद्ध अभिनेता करण टॅकर सध्या चित्रपट आणि वेब सीरीज प्रोजोक्ट्सच्या यशाचा आनंद घेत आहे. पण अभिनय क्षेत्रात त्याला खूप स्ट्रगल करावा लागला.

करणने पडद्यावर अनेक प्रकारचे रोल्स केले. अलीकडेच अभिनेता त्याच्या प्रवासाबद्दल बोलला. बॉलिवूड हंगामासोबत बोलताना म्हणाला की, 'मी माझ्या वडिलांसोबत मिळून बिझनेस सुरु केलेला'

माझे वडिल आधीपासून इंडियन गार्मेंट्सच्या बिझनेसमध्ये होते. मी रिटेल आऊटलेट सुरु केलेलं. तिथे इंडियन आणि वेस्टर्न कपड्यांची विक्री व्हायची.

आमची दोन दुकानं होती. एक जुहू आणि दुसरं लोखंडवाला इथे. रिसेशन आलं. एका मोठ्या शहरातील मोठी बँक कोसळली. आम्ही सगळे कंगाल झालो. रातोरात आमचं आयुष्य रस्त्यावर आलं. आम्हाला आमचं घर विकावं लागलं. जे काही आमच्याजवळ होतं, ते सर्व विकलं. मी माझ्या कुटुंबासोबत गोदामामध्ये शिफ्ट झालो असं करण टॅकर म्हणाला.

त्यावेळी आमच्याकडे काहीच गोष्टी उरल्या होत्या. गोदामच होतं, जिथे परिवार राहू शकत होता. खूप वाईट वेळ आम्ही पाहिलीय. पण आता सगळं ठीक आहे. करण टॅकरने केके मेननसोबत वेब सीरीज 'स्पेशल ऑप्स 2' मध्ये महत्त्वाची भूमिका साकारली आहे. तो एका एजंटच्या भूमिकेत असून बरेच Action सीन्स आहेत.