वेस्ट इंडिजविरुद्धच्या कसोटी मालिकेतून 7 खेळाडूंचा पत्ता कट, कोण आहेत ते जाणून घ्या

आशिया कप स्पर्धा संपल्यानंतर लगेचच भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात दोन सामन्यांची कसोटी मालिका सुरु होणार आहे. या मालिकेसाठी 15 खेळाडूंची नावं जाहीर करण्यात आली आहे. यावेळी सात खेळाडूंना डावलण्यात आलं आहे. कोण आहेत ते जाणून घेऊयात

| Updated on: Sep 26, 2025 | 10:20 PM
1 / 8
वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकेसाठी भारताच्या कसोटी संघाची घोषणा करण्यात आली आहे. शुबमन गिलच्या नेतृत्वाखालील संघात सात खेळाडूंना डावलण्यात आलं आहे. या खेळाडूंचा इंग्लंड दौऱ्यात सहभाग होता. मात्र वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकेत त्यांचा विचार केला गेला नाही. कोण आहेत हे खेळाडू आणि का वगळण्यात आलं ते जाणून घेऊयात.

2 / 8
इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत ऋषभ पंत टीम इंडियाचा यष्टीरक्षक-फलंदाज होता. तसेच त्याच्या खांद्यावर उपकर्णधारपदाची धुरा होता. पण वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकेसाठी पंत नाही. कारण इंग्लंड मालिकेत झालेल्या दुखापतीतून तो सावरलेला नाही. त्यामुळे त्याचा विचार केला गेला नाही.

3 / 8
आठ वर्षानंतर इंग्लंड दौऱ्यात करूण नायरचा विचार केला गेला. देशांतर्गत क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी केल्याने त्याला संधी मिळाली होती. मात्र त्या संधीचं सोनं करता आलं नाही. इंग्लंडविरुद्ध खेळलेल्या 8 डावात त्याने फक्त 205 धावा केल्या होत्या. त्यामुळे त्याचा विचार केला गेला नाही.

4 / 8
अष्टपैलू शार्दुल ठाकुर यालाही संघातून डावलण्यात आलं आहे. त्याच्याकडून इंग्लंड दौऱ्यात फार अपेक्षा होत्या. मात्र अपेक्षेप्रमाणे कामगिरी करू शकला नाही. त्यामुळे त्याच्या विचार केला गेला नाही.

5 / 8
अभिमन्यू ईश्वरन हा कमनशिबी निघाला. त्याची इंग्लंड दौऱ्यासाठी निवड झाली होती. पण पाचही कसोटी सामन्यात बेंचबर बसला. त्याला प्लेइंग 11 मध्ये संधी मिळाली नाही. आता वेस्ट इंडिज दौऱ्यातूनही वगळण्यात आलं आहे.

6 / 8
आकाश दीपने इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत तीन सामने खेळले. या मालिकेत आकाशने इंग्लंडला जेरीस आणलं होतं. आकाशने चांगले आक्रमण केले आणि एकूण 13 विकेट्स घेतल्या. वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकेसाठी आकाश दीपची निवड झाली नाही हे आश्चर्यकारक आहे.

7 / 8
इंग्लंडविरुद्धच्या मालिकेसाठी अर्शदीप सिंग दुखापतग्रस्त झाला होता. तेव्हा त्याच्या जागी युवा वेगवान गोलंदाज अंशुल कंबोजची निवड करण्यात आली. चौथ्या कसोटी सामन्यात मैदानात उतरलेल्या कंबोजने अपेक्षेनुसार कामगिरी केली नाही. त्यामुळे वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकेसाठी त्याची निवड करण्यात आली नाही.

8 / 8
इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत अतिरिक्त वेगवान गोलंदाज म्हणून खेळवण्यात आलेल्या अर्शदीप सिंगची यावेळी निवड झालेली नाही. टीम इंडियाने वेस्ट इंडिजविरुद्ध तीन वेगवान गोलंदाज खेळवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे अर्शदीप सिंगला स्थान मिळालेले नाही.