
भारत ऑस्ट्रेलिया टी20 मालिका 1-1 ने बरोबरीवर आली आहे. पाच सामन्यांच्या टी20 मालिकेतील तीन सामने पार पडले असून एक सामना ऑस्ट्रेलियाने, एक सामना भारताने जिंकला. तर एक सामना पावसामुळे रद्द झाला. आता उर्वरित दोन सामने मालिका विजयासाठी महत्त्वाचा असणार आहे. (Photo- BCCI Twitter)

ऑस्ट्रेलियाने तिसऱ्या टी20 सामन्यात 20 षटकात 6 गडी गमवून 186 धावा केल्या. भारताने हे आव्हान 18.3 षटकात 5 गडी गमवून पूर्ण केलं. या सामन्यात अभिषेक शर्मा फक्त 25 धावांची खेळी करून बाद झाला. पण एक मोठा विक्रम आपल्या नावावर केला. (Photo- BCCI Twitter)

अभिषेक शर्मा भारताकडून टी20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला आहे. अभिषेकने या वर्षात एकूण 705 धावा केल्या आहेत. यापूर्वी हा विक्रम शिखर धवनच्या नावावर होता. त्याने 2018 मध्ये 689 धावा केल्या होत्या. (Photo- BCCI Twitter)

अभिषेक शर्मा पहिल्या टी20 सामन्यात 19, दुसऱ्या टी20 सामन्यात 68 धावा केल्या. तर तिसऱ्या टी20 सामन्यात अभिषेकने 25 धावांची खेळी केली. त्याने आतापर्यंत या मालिकेत 112 धावा केल्या आहेत. (Photo- BCCI Twitter)

अभिषेक शर्माकडे सूर्यकुमारचा विक्रम मोडण्याची संधी आहे. सूर्यकुमार यादवने 2022 मध्ये 31 टी20 सामन्यात 1164 धावा केल्या आहेत. आता हा विक्रम मोडण्यासाठी अभिषेकला पुढच्या 7 सामन्यात 460 धावा कराव्या लागतील. (Photo- BCCI Twitter)