India vs Zimbabwe: अभिषेक शर्माचं आता काय खरं नाही, स्वत:च्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड!
भारत आणि झिम्बाब्वे यांच्यात टी20 मालिका सुरू आहे. या मालिकेतील पहिल्या सामन्यात सलामीवीर अभिषेक शर्मा फेल गेला. त्यामुळे त्याच्या फॉर्मवरून चिंता व्यक्त होत आहे. या वर्षात तर त्याची कामगिरी निराशाजनक राहिली आहे.

भारताने झिम्बाब्वेविरुद्धच्या टी20 मालिकेतील पहिल्या सामन्यात विजय मिळवला. पण या सामन्यात सलामीवीर अभिषेक शर्मा आपली छाप सोडण्यात अपयशी ठरला. अभिषेक शर्माने 8 चेंडूंचा सामना केला आणि 1 धाव करून बाद झाला. अभिषेक शर्माच्या निराशाजनक कामगिरीनंतर आता चर्चांना उधाण आलं आहे. (PC-PTI)

अभिषेक शर्मासाठी हे वर्ष काही खास ठरलं नाही. या वर्षात सातत्यपूर्ण निराशाजनक कामगिरी सुरू आहे. अभिषेक शर्माची टी20 फॉर्मेटमधील बेस्ट फलंदाज म्हणून गणना होते. पण आता त्याचं अव्वल स्थानही गेलं आहे. आयसीसी क्रमवारीत दुसऱ्या क्रमांकावर घसरला आहे. (PC-PTI)

डावखुरा अभिषेक शर्माने यंदाच्या वर्षात 21 डाव खेळले आणि 25.5 च्या सरासरीने 504 धावा केल्या. विशेष म्हणजे या वर्षात अभिषेक शर्मा 11 वेळा 0 ते 10 धावांच्या मध्ये बाद झाला आहे. यात सहा शून्यांचा समावेश आहे. (PC-PTI)

अभिषेक शर्माने या वर्षातील सात डावात 40 पेक्षा कमी धावसंख्या केली आहे. यात एकदा नाबाद राहिला आहे. अभिषेक शर्मासाठी 2026 हे वर्ष खूपच वाईट गेलं आहे. जर त्याची कामगिरी अशीच सुरू राहिली तर संघातील स्थान डळमळीत होईल. (PC-PTI)

अभिषेक शर्माकडे झिम्बाब्वे दौऱ्यात संधी आहे. 25 जुलैला हरारेमध्ये सामना होणार आहे. यात अभिषेक शर्माची बॅट चालली नाही तर तिसऱ्या सामन्यात त्याची जागा प्रभसिमरन घेऊ शकतो. दुसरीकडे, वैभव सूर्यवंशीने अर्धशतकी खेळी केल्याने अभिषेक शर्मावरील दबाव वाढला आहे. (PC-PTI)