AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Amravati Mlc Teacher Constituency Election Result : माझ्यावरही देवाभाऊंचा आशीर्वाद, नाशिक सारखाच इथेही शिंदे शिवसेनेच्या उमेदवारासोबत दगाफटका का?

Amravati Mlc Teacher Constituency Election Result : आज राज्यात विधान परिषदेतील पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या पाच जागांसाठीचा निकाल जाहीर होत आहे. एकूण 26 उमेदवार रिंगणात असून त्यांच्या भाग्याचा आज फैसला होईल.

Amravati Mlc Teacher Constituency Election Result : माझ्यावरही देवाभाऊंचा आशीर्वाद, नाशिक सारखाच इथेही शिंदे शिवसेनेच्या उमेदवारासोबत दगाफटका का?
Sangeeta Shinde
| Updated on: Oct 27, 2026 | 8:43 AM
Share

आज राज्यात विधान परिषदेतील पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या पाच जागांसाठीचा निकाल जाहीर होत आहे. अमरावती शिक्षक मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाकडून किरण सरनाईक, काँग्रेसकडून आदिती पोहरे आणि ठाकरे गटाकडून दत्तात्रय लहाने यांच्यात लढत आहे. शिक्षकांचा कौल कुणाला ? याचा आज फैसला होणार आहे. अमरावतीच्या लोकशाही भवनात मतमोजणीची प्रशासनाकडून तयारी पूर्ण झाली आहे. सकाळी 8 वाजल्यापासून प्रत्यक्ष मतमोजणी प्रक्रिया प्रारंभ झाली आहे. मतमोजणीसाठी 175 अधिकारी-कर्मचाऱ्यांची नियुक्ती झाली आहे. 14 टेबलांवर मतमोजणी होणार आहे. टपाली मतपत्रिकांसाठी स्वतंत्र टेबल आहे. शिक्षक मतदारसंघात 33 हजार 34 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावलेला आहे.निवडणुकीत 92.25 टक्के विक्रमी मतदान झालं.

एकूण 26 उमेदवार रिंगणात असून त्यांच्या भाग्याचा आज फैसला होईल. महायुतीचे उमेदवार तथा विद्यमान आमदार किरण सरनाईक, काँग्रेस उमेदवार अदिती पोहरे आणि भाजपाच्या बंडखोर उमेदवार संगीता शिंदे यांच्यात तिरंगी लढत झाल्याची चर्चा आहे. 12 ते 16 तास मतमोजणीला लागण्याची शक्यता आहे. पहिल्या पसंतीचा 15 ते 16 हजाराचा कोटा कुठल्याही उमेदवारांनी पूर्ण केला नाही तर दुसऱ्या पसंतीची मते मोजावी लागणार आहेत.  मतमोजणीला 12 ते 16 तास लागणार असल्याने निकाल यायला रात्र होईल.

अनिल बोंडे यांचाही आशीर्वाद माझ्यासोबत

भाजपच्या बंडखोर उमेदवार सांगिता शिंदे यांनी निकालाआधी विजयाचा विश्वास व्यक्त केला आहे. “शिक्षण व्यवस्थेला लागलेली कीड नष्ट होणार या निवडणुकीत माझा विजय होईल” भाजपच्या बंडखोर उमेदवार संगीता शिंदे यांचा विश्वास. “माझ्यावर देवाभाऊचाही आशीर्वाद होता. माझे भाऊ खासदार अनिल बोंडे यांचाही आशीर्वाद माझ्यासोबत होता मी नक्की विजयी होईल” असं संगिता शिंदे म्हणाल्या. काही महिन्यांपूर्वी नाशिकमध्ये बंडखोरी झालेली. गोकुळे गीते हे अपक्ष उमेदवार होते. त्यांचे बंधू गणेश गीते भाजपत आहेत. त्यावेळी नरेंद्र दराडे महायुतीचे अधिकृत उमेदवार होते. ते शिंदे शिवसेनेचे उमेदवार होते. पण दराडे यांचा पराभव झालेला. आता अमरावतीमध्ये सुद्धा असं घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.

पुण्यात किती वाजता मतमोजणीला सुरुवात होणार

पुणे विभाग पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाची आज मतमोजणी आहे. पुण्यातील बालेवाडी स्टेडियम येथे सकाळी 8.00 वाजता मतमोजणीला सुरुवात होणार असून मतमोजणीत 47 पदवीधर तर 30 शिक्षक उमेदवारांचे भवितव्य ठरणार आहे. मतमोजणीसाठी प्रशासन सज्ज झालं असून आज संध्याकाळी पर्यंत निकालाचे चित्र स्पष्ट होण्याची शक्यता.

Follow Us
70 टेबलांवर 13 फेऱ्यांमध्ये होणार प्राथमिक मतमोजणी
Maharashtra MLC Result 2026 Complete Overview : 70 टेबलांवर 13 फेऱ्यांमध्ये होणार प्राथमिक मतमोजणी
टायगर श्रॉफ प्रकरणी आरोपींच्या मोबाईलमधून महत्त्वाचे धागेदोरे समोर
Tiger Shroff : टायगर श्रॉफ प्रकरणी आरोपींच्या मोबाईलमधून महत्त्वाचे धागेदोरे समोर
10 तासांच्या खोळंब्यानंतर मध्य रेल्वेची लोकल सेवा सुरळीत!
Mumbai Local Update : Central Line : 10 तासांच्या खोळंब्यानंतर मध्य रेल्वेची लोकल सेवा सुरळीत; मुंबईकरांना मोठा दिलासा
महायुती की महाविकास आघाडी? विधान परिषद निवडणुकीत बंडखोरीचा फटका कुणाला
Maharashtra MLC Election Results 2026 : महायुती की महाविकास आघाडी? विधान परिषद निवडणुकीत बंडखोरीचा फटका कुणाला? निकालाकडे महाराष्ट्राचं लक्ष
मुंबईत लोकलसेवा विस्खळीत; मुंबईकर अडकले, सध्याची परिस्थिती काय?
मुंबईत लोकलसेवा विस्खळीत; मुंबईकर अडकले, सध्याची परिस्थिती काय?
डोंबिवलीकरांचा दुष्काळग्रस्तांसाठी मदतीचा हात, मुख्यमंत्री सहाय्यता...
डोंबिवलीकरांचा दुष्काळग्रस्तांसाठी मदतीचा हात, मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी 1 कोटी 88 लाख जमा
ठाणे स्टेशनवर रेल्वे कर्मचाऱ्यांचा मुजोरपणा? स्टेशनवर प्रचंड गर्दी...
ठाणे स्टेशनवर रेल्वे कर्मचाऱ्यांचा मुजोरपणा? स्टेशनवर प्रचंड गर्दी असतानाही आरक्षित रेल्वेचे दरवाजे बंद
मुंबई लोकलचा खोळंबा कायम! 10 तासांनंतरही... दादर-सीएसएमटी स्थानकांवर
मुंबई लोकलचा खोळंबा कायम! 10 तासांनंतरही... दादर-सीएसएमटी स्थानकांवर प्रवाशांची प्रचंड गर्दी
शेतकऱ्यांची पिळवणूक थांबवा! मायक्रो फायनान्स कंपन्यांनाबाबत ओमराजे...
शेतकऱ्यांची पिळवणूक थांबवा! मायक्रो फायनान्स कंपन्यांनाबाबत ओमराजे निंबाळकरांचा मोठा इशारा
CSMT वर रेल्वेचा खोळंबा! लोकलसह बाहेरगावी जाणाऱ्या गाड्याही 2 तास उशिर
CSMT वर रेल्वेचा खोळंबा! प्रवाशांची प्रचंड गर्दी, लोकलसह बाहेरगावी जाणाऱ्या गाड्याही 2 तास उशिराने