IND vs ZIM: अभिषेक शर्माला प्लेइंग 11 मध्ये ठेवायचं की नाही? झिम्बाब्वेत नोंदवला नकोसा विक्रम

अभिषेक शर्माचा आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमध्ये फ्लॉप शो सुरूच आहे. झिम्बाब्वेविरुद्धच्या तिसऱ्या टी20 सामन्यातही फेल गेला. या मालिकेत त्याला एकदाही दुहेरी आकडा गाठता आला नाही. या कामगिरीसह नकोसा विक्रम त्याच्या नावावर नोंदवला गेला आहे.

| Updated on: Jul 26, 2026 | 7:01 PM
1 / 5
झिम्बाब्वेविरुद्धच्या तीन सामन्यांच्या टी20 मालिकेत भारताने जबरदस्त कामगिरी केली आहे. पण हा दौरा अभिषेक शर्मासाठी काही खास ठरला नाही. या मालिकेत त्याची बॅट पूर्णपणे शांत राहिली. या मालिकेतील शेवटच्या सामन्यात फक्त 2 धावा करून बाद झाला. (PHOTO CREDIT- PTI)

2 / 5
या मालिकेत झिम्बाब्वेचा वेगवान गोलंदाज ब्लेसिंग मुजरबानी अभिषेक शर्मासाठी वाईट स्वप्न ठरला आहे. या मालिकेतील तिन्ही सामन्यात मुजरबानीने त्याला तंबूचा रस्ता दाखवला आहे. अभिषेक शर्माला तिन्ही डावात एकूण 11 धावा करता आल्या. (PHOTO CREDIT- PTI)

3 / 5
झिम्बाब्वेविरुद्ध निराशाजनक कामगिरी केल्यानंतर अभिषेक शर्माच्या नावावर नकोसा विक्रम रचला गेला आहे. टॉप 7 भारतीय फलंदाजांमध्ये टी20 मालिकेत सर्वात कमी धावा करणारा फलंदाज ठरला आहे. कमीत कमी तीन सामन्यांच्या मालिकेत हा नकोसा विक्रम नोंदवला गेला आहे. (PHOTO CREDIT- PTI)

4 / 5
अभिषेक शर्मापूर्वी हा विक्रम श्रेयस अय्यरच्या नावावर होता. श्रेयस अय्यरने वेस्ट इंडिजविरुद्ध 2019 मध्ये टी20 मालिकेत फक्त 14 धावा केल्या होत्या. पण आता हा नकोसा विक्रम अभिषेक शर्माच्या नावावर नोंदवला गेला आहे. कारण त्याने त्याच्या पेक्षा सुमार कामगिरी केली आहे. (PHOTO CREDIT- PTI)

5 / 5
सलग चार सामन्यात एकेरी धावसंख्येवर बाद होणारा अभिषेक शर्मा हा भारताचा चौथा सलामीवीर आहे. यापूर्वी इंग्लंडविरुद्धच्या शेवटच्या टी20 सामन्यात फक्त 3 धावा करून बाद झाला आहे. 2010 मध्ये मुरली विजय, 2020 मध्ये केएल राहुल, विरेंद्र सेहवाग 2007 ते 2009 दरम्यान आणि आता अभिषेक शर्मा या यादीत सहभागी झाला आहे. (PHOTO CREDIT- PTI)

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us