आशिया कप स्पर्धेत वैभव सूर्यवंशी अव्वल स्थानी, पण पाकिस्तानच्या खेळाडूने एका बाबतीत टाकलं मागे

रायझिंग स्टार आशिया कप स्पर्धेत वैभव सूर्यवंशीने चकदार कामगिरी करत आपली छाप सोडली आहे. भारताने उपांत्य फेरीत धडक मारली आहे. पण आतापर्यंत खेळलेल्या तीन सामन्यात वैभव सूर्यवंशी अव्वल स्थानी विराजमान आहे. चला जाणून घेऊयात त्याच्याबाबत

Updated on: Nov 20, 2025 | 8:27 PM
1 / 5
रायझिंग स्टार्स आशिया कप स्पर्धेतील साखळी फेरीचे सामने संपले असून उपांत्य फेरीत भारताचा सामना बांगलादेशशी होणार आहे. या सामन्यात सर्वांच्या नजरा या वैभव सूर्यवंशीकडे असणार आहेत. कारण साखळी फेरीत 89 फलंदाजांमध्ये वैभवची कामगिरी सर्वोत्तम ठरली आहे. (Photo- ACC/Asiancricket)

2 / 5
साखळी फेरीत तीन सामने पार पडले. यात वैभव सूर्यवंशीने 242.16 च्या स्ट्राईक रेटने धावा केल्या. यासह या स्पर्धेत सर्वोत्तम स्ट्राईक रेट असलेला फलंदाज ठरला आहे. (Photo- ACC/Asiancricket)

3 / 5
तीन सामन्यात सर्वाधिक षटकार मारणाऱ्या फलंदाजांच्या यादीतही वैभव सूर्यवंशी अव्वल स्थानी आहे. त्याने या स्पर्धेत एकूण 18 षटकार मारले आहेत. त्यानंतर पाकिस्तानचा माज सदाकत 16 षटकारांसह दुसऱ्या स्थानावर आहे. (Photo- ACC/Asiancricket)

4 / 5
वैभव सूर्यवंशी एका सामन्यात सर्वाधिक धावा करण्याऱ्या खेळाडूंच्या यादीतही पहिल्या स्थानावर आहे. त्याने युएईविरुद्धच्या सामन्यात 42 चेंडूत 15 षटकार आणि 11 चौकार मारत 144 धावा केल्या होत्या. (Photo- ACC/Asiancricket)

5 / 5
वैभव सूर्यवंशी सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत मात्र दुसऱ्या स्थानावर आहे. पाकिस्तानच्या माज सदाकतने 3 सामन्यात एकूण 212 धावा केल्या आहे. तर वैभव सूर्यवंशीने 201 धावा केल्या आहे. वैभवने उपांत्य फेरीत चांगली कामगिरी केली तर त्यालाही मागे टाकेल.  (Photo- ACC/Asiancricket)