
वेस्ट इंडिज विरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात विराट कोहलीचं शतक क्रीडाप्रेमींना पाहायला मिळालं. या शतकी खेळीनंतर अनुष्का शर्माही खूश दिसली आणि तिने आपल्या भावना व्यक्त केल्या. (Photo: AFP)

विराट कोहलीने 206 चेंडूत 11 चौकारांच्या मदतीने 121 धावा केल्या. पाच वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर विराट कोहलीने विदेशी धरती शतक झळकावलं आहे. (Photo: PTI)

विराट कोहलीच्या या कामगिरीनंतर पत्नी आणि बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्माही खूश झाली. तिने इंस्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे. यात हार्ट इमोजी शेअर आपलं प्रेम व्यक्त केलं आहे. (Photo: Anushka Sharma Instagram)

विराट कोहलीने शतक झळकावताच जर्सीचं बटण खोललं आणि गळ्यातून चेन बाहेर काढली. त्यातील किमती अंगठीला किस केलं. विराटची ही वेडिंग रिंग आहे. अनुष्काच्या प्रेमापोटी तो कायम आपल्या जवळ ठेवतो. (Photo: AFP)

विराट कोहली याचा हा 500 वा सामना आहे. या सामन्यात त्याने जबरदस्त खेळीचं प्रदर्शन केलं. पाचव्या गड्यासाठी रवींद्र जडेजासोबत 159 धावांची भागीदारी केली आणि संघाला मोठी धावसंख्या उभारून दिली. (Photo: AFP)