भारताने 500 धावांचा पल्ला कोणत्या संघाविरुद्ध सर्वाधिक वेळा गाठला आहे? जाणून घ्या एका क्लिकवर
भारत आणि श्रीलंका यांच्यात दुसरा कसोटी सामना सुरू आहे. या कसोटी सामन्याच्या पहिल्या डावात भारताने 503 धावा केल्या आणि डाव घोषित केला. भारताने कोणत्या संघाविरुद्ध सर्वाधिक वेळा 500 धावांचा पल्ला गाठला आहे. चला जाणून घेऊयात...

भारताने पाकिस्तानविरुद्ध 59 कसोटी सामन्यात 10वेळा 500हून अधिक धावा केल्या आहेत. कदाचित या आकडेवारीत आणखी वाढ झाली असती. पण गेल्या काही वर्षात या दोन्ही संघात एकही कसोटी सामना झालेला नाही. (PC-PTI)

भारताने वेस्ट इंडिजविरुद्ध 12 वेळा 500हून अधिक धावांचा पल्ला गाठला आहे. भारताने वेस्ट इंडिजविरुद्ध खेळलेल्या 102 कसोटी सामन्यात ही कामगिरी केली आहे. (PC-PTI)

इंग्लंडविरुद्ध भारतीय संघाने 141 सामन्यात 13 वेळा 500हून अधिक धावा केल्या आहेत. इंग्लंडविरुद्ध टीम इंडियासाठी 500 धावांचा आकडा गाठणं वाटतं तितकं सोपं नाही. पण भारताने ही कामगिरी 13वेळा केली आहे. (PC-PTI)

ऑस्ट्रेलियासारख्या दिग्गज संघाविरुद्ध भारताने 112 कसोटी सामन्यात 17वेळा 500हून अधिक धावा केल्या आहेत. ऑस्ट्रेलियाचा कसोटी क्रिकेटमध्ये वरचष्मा आहे. मात्र अशा स्थितीतही भारताने जबरदस्त कामगिरी केली आहे. (PC-PTI)

भारताने श्रीलंकेविरुद्ध कमी सामन्यात 17 वेळा 500 धावांचा पल्ला गाठला आहे. श्रीलंकेविरुद्ध फक्त 48 सामन्यात भारतीय संघाने ही कामगिरी केली आहे. (PC-PTI)