
महिला वनडे वर्ल्ड कप स्पर्धेच्या पहिल्या सामन्यात भारत आणि श्रीलंका आमनेसामने आले आहेत. भारताने श्रीलंकेसमोर विजयासाठी 271 धावांचं आव्हान ठेवलं आहे. या धावसंख्येत दीप्ती शर्मा आणि अमनजोत कौर यांची खेळी महत्त्वाची ठरली. (फोटो- बीसीसीआय ट्वीटर)

भारताकडून अमनजोत कौरने सर्वाधिक 57 धावा केल्या. यासाठी तिने 56 चेंडूंचा सामना केला आणि टीम इंडियाला संकटातून बाहेर काढलं.तिने पाच चौकार आणि एक षटकार मारला. महत्त्वाची गोष्ट म्हणजे अमनजोतने आठव्या क्रमांकावर फलंदाजी करताना ही खेळी केली. (फोटो- पीटीआय)

अमनजोत कौरने शानदार अर्धशतक झळकावून एक मोठा विक्रम रचला आहे.अमनजोत कौरने आठव्या क्रमांकावर फलंदाजी केली आणि 50 पेक्षा जास्त धावा केल्या.महिला विश्वचषकात भारतीय भूमीवर हा पराक्रम करणारी ती पहिली क्रिकेटपटू ठरली. (फोटो- बीसीसीआय ट्वीटर)

अमनजोतचा जन्म 25 ऑगस्ट 2000 रोजी मोहाली येथे झाला. तिचे वडील भूपिंदर सिंग हे सुतार आहेत. त्यांनी अमनजोतची पहिली बॅट बनवली. मुलीच्या क्रिकेट खेळण्याने ते नेहमीच नाराज असायचे. पण तिला तिच्या आजीचा पाठिंबा होता. (फोटो- बीसीसीआय ट्वीटर)

वयाच्या 15 व्या वर्षापर्यंत ती केवळ क्रिकेटच नाही तर मुलांसोबत फुटबॉल, हॉकी आणि हँडबॉल देखील खेळली. त्यानंतर नागेश गुप्ताच्या अकादमीत सामील झाली. तिथे तिच्या बॅटच्या स्विंगने प्रशिक्षकांचे लक्ष वेधून घेतले. (फोटो- बीसीसीआय ट्वीटर)