
इंडियन प्रीमियर लीग 2022 सुरू होण्यापूर्वीच दिल्ली कॅपिटल्सला वाईट बातमी मिळाली आहे. त्यांचा वेगवान गोलंदाज एनरिक नॉर्खिया आयपीएल 2022 मधून बाहेर पडू शकतो. मिळालेल्या वृत्तानुसार, एनरिक नॉर्खिया अजूनही फिट झालेला नाही आणि तपासणीनंतरच त्याला आयपीएल खेळण्याची परवानगी दिली जाईल. (PC-BCCI/IPL)

क्रिकेट दक्षिण आफ्रिकेच्या निवड समितीच्या अधिकाऱ्याने ईएसपीएन क्रिकइन्फोला सांगितले की एनरिक नॉर्खियाचं आयपीएलमध्ये खेळणं कठीण आहे. दुखापतीमुळे तो नोव्हेंबरपासून फारशी गोलंदाजी करू शकलेला नाही. वैद्यकीय पथकाच्या सल्ल्यानंतरच त्याला आयपीएल खेळण्याची परवानगी दिली जाईल. (PC-BCCI/IPL)

एनरिक नॉर्खिया हिपच्या दुखापतीशी झुंज देत आहे. बांगलादेशविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी त्याला दक्षिण आफ्रिकेच्या संघात स्थान मिळालेलं नाही. जर नॉर्खिया आयपीएल 2022 मधून बाहेर पडला तर दिल्ली कॅपिटल्ससाठी हा मोठा धक्का असेल. (PC-BCCI/IPL)

नॉर्खिया हा दिल्ली कॅपिटल्सने संघात कायम ठेवलेल्या चार खेळाडूंपैकी एक आहे. नॉर्खियाला दिल्लीने 6.50 कोटींमध्ये संघात कायम ठेवलं आहे. गेल्या दोन मोसमात नॉर्खियाने चांगली कामगिरी केली होती. नॉर्खियाने 2020 मध्ये 22 विकेट घेतल्या होत्या. तर गेल्या मोसमात त्याने 8 सामन्यात 12 विकेट घेतल्या होत्या. (PC-BCCI/IPL)

नॉर्खियाशिवाय दक्षिण आफ्रिकेचे आणखी 8 मोठे खेळाडू आयपीएलच्या सुरुवातीच्या सामन्यांमध्ये खेळण्याची शक्यता कमी आहे. कारण क्विंटन डी कॉक, मार्को यान्सिन, एडन मार्कराम, डेव्हिड मिलर, लुंगी एनगिडी, ड्वेन प्रिटोरियस, कागिसो रबाडा आणि रॅसी व्हॅन डर दुसान यांना बांगलादेशविरुद्धच्या वनडे मालिकेत संधी मिळाली आहे. (PC-BCCI/IPL)