
आयपीएल 2026 स्पर्धेसाठी मिनी लिलाव प्रक्रिया 16 डिसेंबर रोजी पार पडणार आहे. फ्रेंचायझी आपल्या आवडत्या आणि आवश्यक असलेल्या खेळाडूंसाठी बोली लावणार आहे. त्यामुळे काही खेळाडूंसाठी कोट्यवधीची बोली लागणार आहे. (Photo: BCCI/IPL)

फ्रेंचायझींनी आपल्याला आवश्यक असलेल्या जास्तीत खेळाडूंना रिटेन केलं आहे. तर काही खेळाडूंना रिलीज केलं आहे. त्यामुळे रिलीज खेळाडूंसाठी आरटीएम कार्ड वापरता येईल का? असा प्रश्न अनेकांना पडला आहे. (Photo: BCCI/IPL)

मिनी लिलावात आरटीएम कार्ड वापरता येत नाही. कारण मिनी लिलावापूर्वी जास्तीत जास्त खेळाडू रिटेन करण्याची मुभा असते. त्यामुळे एखादा खेळाडू रिलीज केला तर त्याच्यासाठी आरटीएमचा पर्याय नाही. (Photo: BCCI/IPL)

आरटीएम कार्ड वापरता येणार नसल्याने संघ त्यांच्या रिलीज केलेल्या खेळाडूंना परत मिळवण्यासाठी मोठी बोली लावताना दिसतील. यावेळी, मिनी लिलाव देशाबाहे अबू धाबीमध्ये होणार आहे. 16 डिसेंबरला हा मिनी लिलाव पार पडणार आहे. (Photo: BCCI/IPL)

आयपीएलच्या इतिहासात 2012 पर्यंत कोणतेही कार्ड नव्हते. हे कार्ड पहिल्यांदा 2013 मध्ये सादर करण्यात आले होते. फक्त मेगा लिलावासाठी हे कार्ड वापरले जात जाते. संघ त्यांनी सोडलेल्या खेळाडूवर आरटीएम कार्ड लावून आणि रक्कम जुळवून खेळाडू मिळवू शकते. (Photo: BCCI/IPL)

2022 आयपीएलमध्ये दोन नवीन संघ सामील झाले. गुजरात आणि लखनौ या दोन नवीन फ्रँचायझींचा समावेश करण्यात आला. उर्वरित आठ संघांना मेगा लिलावात फायदा मिळू नये. तसेच स्पर्धा समान राहावी यासाठी आरटीएम कार्ड वापरले गेले नाहीत. (Photo: BCCI/IPL)