Lionel Messi: फिफा वर्ल्डकप स्पर्धेत लियोनल मेस्सीने रचला इतिहास, अशी कामगिरी करणारा एकमेव खेळाडू

अर्जेंटिनाचा स्टार फुटबॉलपटू लियोनल मेस्सीने फिफा वर्ल्डकप स्पर्धेत ऐतिहासिक कामगिरी केली आहे. तसेच एक मोठा विक्रम आपल्या नावावर केला आहे. अशी कामगिरी करणारा जगातील एकमेव खेळाडू आहे. यापूर्वी अशी कामगिरी कोणत्याही खेळाडूने केलेली नाही.

| Updated on: Jun 28, 2026 | 3:38 PM
1 / 5
फिफा वर्ल्डकप 2026 स्पर्धेतील साखळी फेरीतील शेवटच्या सामन्यात अर्जेंटीनाचा कर्णधार आणि स्टार फुटबॉलपटू लियोनल मेस्सीने जबरदस्त कामगिरी केली. जॉर्डनविरुद्धच्या सामन्यात मेस्सीने गोल करत एक नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. या सामन्यात अर्जेंटीनाने जॉर्डनला 3-1 ने पराभूत केलं. (PHOTO CREDIT- PTI)

2 / 5
सामन्यापूर्वी अर्जेंटीना या गटातून पुढच्या फेरीत जाणार हे ठरलं होतं. त्यामुळे या सामन्यात मेस्सी प्लेइंग 11 मध्ये स्थान दिलं नाही. पण 60 व्या मिनिटाला मेस्सीची एन्ट्री झाली आणि इतिहास रचला. (PHOTO CREDIT- PTI)

3 / 5
लियोनल मेस्सीने या सामन्याच्या 80 व्या मिनिटाला फ्री किकच्या माध्यमातून गोल मारला. यासह वर्ल्डकप स्पर्धेच्या इतिहासात सलग सात सामन्यात गोल करणारा खेळाडू होण्याचा मान मिळवला आहे. (PHOTO CREDIT- PTI)

4 / 5
लियोनल मेस्सीने फिफा वर्ल्डकप 2026 स्पर्धेच्या साखळी फेरीतील तीन सामन्यात गोल मारले आहेत. यापूर्वी 2022 वर्ल्डकप स्पर्धेच्या ग्रुप 16, उपांत्यपूर्व, उपांत्य आणि अंतिम फेरीत गोल मारले होते. (PHOTO CREDIT- PTI)

5 / 5
फिफा वर्ल्डकप स्पर्धेत लियोनल मेस्सीच्या नावावर आता 19 गोल झाले आहे. आतापर्यंत फिफा वर्ल्डकप स्पर्धेत हे सर्वाधिक गोल आहेत. या पर्वात त्याने सहा गोल मारले असून गोल्डन बूटच्या शर्यतीत पुढे आहे. (PHOTO CREDIT- PTI)

Follow Us