अर्शदीप सिंगने फक्त 9 चेंडूत दिलं गौतम गंभीरला उत्तर, आता पुढच्या सामन्यात जागा कन्फर्म!

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या टी20 सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियाला 5 गडी राखून पराभूत केलं. या सामन्यात अर्शदीपने भेदक गोलंदाजी करत ऑस्ट्रेलियाला बॅकफूटवर ढकललं. त्याने मिळालेल्या संधीचं सोनं केलं.

| Updated on: Nov 02, 2025 | 6:18 PM
1 / 5
ऑस्ट्रेलिया विरूद्धच्या तिसऱ्या टी20 सामन्यात अर्शदीप सिंगला खेळण्याची संधी मिळाली. मागच्या दोन सामन्यात त्याला बेंचवरच बसावं लागलं होतं. त्यामुळे सर्वच स्तरातून या निर्णयावर टीका होत होती. अखेर त्याला संधी मिळाली आणि त्या संधीचं त्याने सोनं केलं. (Photo- BCCI Twitter)

2 / 5
अर्शदीप सिंग नव्या चेंडूने गोलंदाजी करताना स्विंगसाठी ओळखला जातो. त्यामुळे त्याचा सामना करताना फलंदाजांना अडचणीचं जातं. होबार्टच्या खेळपट्टीवर असंच चित्र पाहायला मिळालं. त्याने नव्या चेंडूसह पहिल्या षटकात टीम इंडियाला विकेट मिळवून दिली. (Photo- BCCI Twitter)

3 / 5
अर्शदीप सिंगने पहिल्याच षटचकात ट्रेविस हेडला तंबूचा रस्ता दाखवला. त्याने 4 चेंडूत फक्त 6 धावा केल्या. तर पुढच्या षटकात अर्शदीप सिंगने जोश इंग्लिसला तंबूचा रस्ता दाखवला. दुसऱ्या षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर त्याने ही विकेट घेतली. म्हणजेच 9 चेंडूत 2 विकेट घेतल्या. (Photo- BCCI Twitter)

4 / 5
पॉवर प्लेच्या 2 षटकात अर्शदीप सिंगने भेदक गोलंदाजी केली. त्याने 5.50 च्या इकोनॉमीने 11 धावा दिल्या. त्यामुळे सुरुवातीला झटपट विकेट घेण्यात अर्शदीपचा हातखंडा असल्याचं दिसून आलं आहे. त्यामुळे त्याला चौथ्या टी20 सामन्यात डावलणं कठीण आहे. (Photo- PTI)

5 / 5
अर्शदीप सिंग भारताकडून सर्वात प्रभावी गोलंदाज ठरला. त्याच्या या कामगिरीसाठी त्याला सामनावीराच्या पुरस्काराने गौरविण्यात आले. त्याने 4 षटकात 35 धावा देत 3 गडी बाद केले. (Photo- PTI)