
वुमन्स प्रीमियर लीग 2026 स्पर्धा 9 जानेवारीपासून सुरु होत आहे. पण गुजरात जायंट्स स्पर्धेतील पहिला सामना 10 जानेवारीला खेळणार आहे. पहिल्या सामन्यात गतविजेता मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आमनेसामने येतील. हा सामना नवी मुंबईतील डीवाय पाटील स्टेडियममध्ये होणार आहे. (फोटो- Gujrat Giants Twitter)

वुमन्स प्रीमियर लीगमध्ये गुजरात जायंट्स संघाची कर्णधार म्हणून एशले गार्डनरची निवड करण्यात आली आहे. पुढील हंगामासाठी ऑस्ट्रेलियन अष्टपैलू खेळाडूची कर्णधार म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे, असे गुजरात जायंट्स फ्रँचायझीने सांगितले आहे. (फोटो- Gujrat Giants Twitter)

मागच्या पर्वात गुजरात जायंट्स संघाचे नेतृत्व यष्टीरक्षक-बॅटर बेथ मुनी यांनी केले होते. मुनी यांच्या नेतृत्वाखाली गुजरात संघाने अपेक्षेनुसार कामगिरी केली नाही. 2025 मध्ये त्यांनी फक्त 4 सामने जिंकले. पण बाद फेरीसाठी पात्र ठरले. गुजरात जायंट्सचा एलिमिनेटरमध्ये मुंबई इंडियन्सकडून 11 धावांनी पराभव झाला आणि अंतिम फेरीत पोहोचण्याचे स्वप्न भंगलं. (फोटो- Gujrat Giants Twitter)

28 वर्षीय एशले गार्डनर ही गेल्या तीन पर्वात गुजरात जायंट्सकडून खेळली आहे. मेगा लिलावापूर्वी गुजरातने तिला 3.50 कोटी रुपयांना रिटेने केले होते. आगामी पर्वात ती सर्वात महागड्या खेळाडूंपैकी एक असेल. तिने स्पर्धेत गुजरातसाठी 25 सामने खेळले आहेत. (फोटो- Gujrat Giants Twitter)

गुजरात जायंट्स संघ : एशले गार्डनर (कर्णधार), बेथ मूनी, सोफी डिवाइन, रेणुका सिंह ठाकुर, भारती फुलमाली, तितास साधु, काशवी गौतम, कनिका आहूजा, तनुजा कंवर, जॉर्जिया वेयरहॅम, अनुष्का शर्मा, हॅप्पी कुमारी, किम गर्थ, यास्तिका भाटिया, शिवानी सिंह, डॅनी व्याट-हॉज, राजेश्वरी गायकवाड़, आयुषी सोनी. (फोटो- Gujrat Giants Twitter)