
भारतीय फलंदाजांनी पाकिस्तानी गोलंदाजांच्या चिंधड्या उडवल्या. आघाडीच्या चार फलंदाजांनी मिळून 356 धावांची खेळी केली.

रोहित शर्मा आणि शुबमन गिल यांनी अर्धशतकी खेळी केली. तर विराट कोहली आणि केएल राहुल यांनी शतक ठोकली. रोहित शर्मा याने 56, शुबमन गिलने 58 धावा केल्या. तर विराट कोहलीने नाबाद 122 आणि केएल राहुल याने नाबाद 111 धावा केल्या.

भारताच्या टॉप 4 फलंदाजांनी 50 हून अधिक धावा केल्या. अशी कामगिरी भारतीय क्रिकेट इतिहासात चौथ्यांदा पाहायला मिळाली आहे.

भारतीय फलंदाजांनी पाकिस्तान विरोधात दुसऱ्यांदा अशी कामगिरी केली आहे.

विराट कोहली आणि केएल राहुल यांनी तिसऱ्या विकेटसाठी नाबाद 233 धावांची भागीदारी केली. आशिया कप स्पर्धेतील ही सर्वात मोठी भागीदारी ठरली आहे.

विराट कोहली यानेही शतकी खेळी करत वनडे क्रिकेटमध्ये 13 हजार धावा पूर्ण केल्या आहेत. अशी कामगिरी करणारा तो जगातील पाचवा खेळाडू आहे.