
वर्ल्ड कपआधी टीम इंडियाची आशिया कप 2023 मध्ये अग्निपरीक्षा असणार आहे. या आशिया कपमध्ये टीम इंडियाच्या 5 खेळाडूंच्या कामगिरीवर सर्वांचंच लक्ष असणार आहे.

आशिया कपला 30 ऑगस्टपासून सुरुवात होतेय. टीम इंडियाचा पहिलाच सामना पाकिस्तान विरुद्ध असणार आहे. त्यामुळे या हायव्होल्टेज सामन्यात टीम इंडियाच्या खेळाडूंकडे सर्वाचंच लक्ष असेल.

शुबमन गिल याने 2023 वर्षात आतापर्यंत 12 वनडेत 68.18 च्या सरासरीने 3 शतकांच्या मदतीने 750 धावा केल्या आहेत. त्यामुळे शुबमनची आशिया कपमध्ये मोठी जबाबदारी असेल.

आशिया कपमध्ये टीम इंडियाच्या फिरकीची मुख्य जबाबदारी ही कुलदीप यादव याच्या खांद्यावर असेल. कुलदीपने या वर्षातील 11 सामन्यांमध्ये 22 विकेट्स घेतल्या आहेत.

जसप्रीत बुमराह याने आयर्लंड विरुद्ध दमदार कमबॅक केलं. कॅप्टन म्हणून टीम इंडियाला सीरिज जिंकून दिली. बुमराह मॅन ऑफ द सीरिज ठरला. त्यामुळे आता आशिया कपमध्ये बुमराहच्या जुन्या बॉलिंगची धार नव्याने पाहण्यासाठी क्रिकेट चाहते उत्सुक आहेत.

विराट कोहली याने टीम इंडियाला अनेकदा एकहाती सामने जिंकून दिले आहेत. त्यामुळे तशीच कामगिरी विराटकडून अपेक्षित आहे.

रोहित शर्मा याच्या नेतृत्वात टीम इंडियाने 2018 मध्ये अखेरचा आशिया कप जिंकला होता. मात्र तेव्हापासून टीम इंडियाला आशिया किंग होता आलेलं नाही. त्यामुळे रोहितवर यंदा बॅट्समन आणि कॅप्टन अशी दुहेरी जबाबदारी यशस्वीरित्या पार पाडण्याचं आव्हान असणार आहे.