अभिषेक शर्माने अर्धशतकासह रचला आणखी एक विक्रम, आता रोहित शर्माशी केली बरोबरी

भारत श्रीलंका सामन्यात पुन्हा अभिषेक शर्माची आक्रमक खेळी क्रीडारसिकांना पाहता आली आहे. अभिषेक शर्मा सध्या फॉर्मात असून प्रतिस्पर्धी संघांवर तुटून पडत आहे. या सामन्यातही अभिषेक शर्माने श्रीलंकन गोलंदाजांना फोडून काढलं.

| Updated on: Sep 26, 2025 | 9:00 PM
1 / 5
आशिया कप 2025 स्पर्धेतील सुपर 4 फेरीत भारत आणि श्रीलंका हे संघ आमनेसामने आले आहेत. या सामन्यात भारताच्या वाटेला प्रथम फलंदाजी आली. या सामन्यातही अभिषेक शर्माने गोलंदाजांची धुलाई केली. त्याच्या आक्रमक खेळीने गोलंदाज पुरते हतबल झाले होते.(Photo- BCCI Twitter)

2 / 5
अभिषेक शर्माने 22 चेंडूत 7 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने अर्धशतक पूर्ण केलं. यावेळी त्याचा स्ट्राईक रेट हा 231.82 चा होता. या स्पर्धेतील अभिषेक शर्माचं सलग तिसरं अर्धशतक आहे. (Photo- BCCI Twitter)

3 / 5
अभिषेक शर्माने यापूर्वी पाकिस्तान विरुद्ध 39 चेंडूत 74 धावांची खेळी केली होती. तर बांगलादेशविरुद्ध 37 चेंडूत 75 धावा केल्या होत्या. आता पुन्हा एकदा अर्धशतकी खेळी केली आहे. तर श्रीलंकेविरुद्ध 31 चेंडूत 61 धावा करून बाद झाला. यावेळी त्याने 8 चौकार आणि 2 षटकार मारले. (Photo- BCCI Twitter)

4 / 5
अभिषेक शर्माने या अर्धशतकासह रोहित शर्माच्या विक्रमाची बरोबरी केली आहे. 25 किंवा त्यापेक्षा कमी चेंडूत अर्धशतक ठोकणाऱ्या भारतीय खेळाडूंच्या यादीत रोहित शर्मासह दुसऱ्या स्थानावर आहे. दोघांनी 6 वेळा अशी कामगिरी केली आहे. तर सूर्यकुमार यादवने 7 वेळा अशी कामगिरी केली आहे. (Photo- BCCI Twitter)

5 / 5
टी20 फॉर्मेटमध्ये सलग 30 हून अधिक धावा करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत संयुक्तरित्या टॉपला आला आहे. त्याने सातव्यांदा अशी कामगिरी केली आहे. यापूर्वी हा विक्रम पाकिस्तानचा मोहम्मद रिझवान आणि रोहित शर्माच्या नावावर होता. (Photo- BCCI Twitter)