
भारताची गेल्या काही वर्षात अॅथेलेटिक्समध्ये उल्लेखनीय आणि नेत्रदीपक कामिगरी राहिलीय. एशियन गेम्स, कॉमनवेल्थ आणि ऑलिम्पिक स्पर्धेत सहभागी होणाऱ्या अॅथेलेटिक्सच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. त्यात आता आगामी पॅरिस ऑलिम्पिकसाठी मुरली श्रीशंकर याने क्वालिफाय केलं आहे. (Photo: PTI)

भारताचा अव्वल क्रमाकांचा मुरली श्रीशंकर याने ऑलिम्पिक 2024 साठी क्वालिफाय केलंय. श्रीशंकरने ऑलिम्पिक 2024 साठी पात्र ठरण्यासाठी 8.27 मीटर अंतर यशस्वीरित्या पूर्ण केलं. (Photo: PTI)

मुरली श्रीशंकर याने शनिवारी 8.37 मीटर लांब उडी मारत रौप्य पदकाची कमाई केली. (Photo: AFP)

मुरली श्रीशंकर याला स्वत:चा 8.41 मीटर लांब उडीचा रेकॉर्ड ब्रेक करण्याची संधी होती. मात्र ही संधी अवघ्या .4 ने हुकली. (Photo: PTI)

तसेच 4x400 मीटर मिक्स्ड रिलेमध्ये टीम इंडियाने सुवर्ण पदकाची कमाई केली. राजेश रमेश, ऐश्वर्या मिश्रा, अमोज जेकब आणि शुभा वेंकटेशन या टीमने 3.14.70 मिनिटांमध्ये ही शर्यत पूर्ण केली. (Photo: Twitter/Aishwarya Mishra)