
ऑस्ट्रेलियाचा स्टार अष्टैपलू खेळाजू ग्लेन मॅक्सवेल (Glenn Maxwell) याने नुकतंच आयपीएलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाकडून (RCB) अप्रतिम प्रदर्शन केलं. अनेक भारतीयांची मन जिंकणारा ग्लेन आता भारताचाच जावई होणार आहे. तो त्याची भारतीय वंशाची गर्लफ्रेंड विनी रमन (Vini Raman) हिच्यासोबत लवकरच लग्न करणार असून त्याने् सोशल मीडियावर याबाबतची माहिती दिली.

विनी रामन ही भारतीय वंशाची असली तरी तिचा जन्म ऑस्ट्रेलियातच झाला आहे. 3 मार्च 1993 मध्ये जन्माला आलेल्या विनीचे पालक भारतीय आहेत. विनी रमन मूळची दाक्षिण भारताची आहे. तिचे आई-बाबा कामानिमित्त ऑस्ट्रेलियात गेले आणि तिथेच स्थायिक झाले.

नुकताच म्हणजे गुरुवारी (14 ऑक्टोबर) मॅक्सवेलचा वाढदिवस झाला. यावेळी त्याने इन्स्टा स्टोरीमधून विनीला मी तुझ्याशी लग्नासाठी आतुर आहे आणि 2022 हे आपलंच वर्ष असल्याचं म्हटलं आहे,

विना एक फार्मासिस्ट असून तिने सायन्समधूनच संपूर्ण शिक्षण घेतलं आहे.

मागील वर्षी 26 फेब्रुवारी रोजी मॅक्सवेल आणि विनी यांचा साखरपुडा झाला. यावेळी दोघांचे कुटंब याठिकाणी होते. मॅक्सवेल भारतीय पारंपरीत वेशाखात फार भारी दिसत होता.