AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आज बाळासाहेब नाहीत तेच बरं झालं, तो माणूस…, अन् बोलता बोलता राज ठाकरे भावूक

आज शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची जयंती आहे,  बाळासाहेब ठाकरे यांचं जन्मशताब्दी वर्ष सुरू होत आहे, यानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलताना मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या आठवणींना उजळला दिला,

आज बाळासाहेब नाहीत तेच बरं झालं, तो माणूस..., अन् बोलता बोलता राज ठाकरे भावूक
Raj Thackeray Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Jan 23, 2026 | 8:15 PM
Share

आज शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची जयंती आहे,  बाळासाहेब ठाकरे यांचं जन्मशताब्दी वर्ष सुरू होत आहे, यानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलताना मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या आठवणींना उजळला दिला, बाळासाहेब ठाकरे यांच्या आठवणीला उजाळा देताना राज ठाकरे चांगलेच भावूक झाले, तसेच यावेळी बोलताना त्यांनी सध्या सुरू असलेल्या राजकीय परिस्थितीचा देखील आपल्या खास शैलीमध्ये समाचार  घेतला आहे. ‘बाळासाहेब ठाकरे यांचं जन्मशताब्दी वर्ष सुरू होतंय. सामनात माझा आज एक लेख आला आहे. मी त्यात त्यांच्याविषयी अनेक आठवणी लिहिल्या आहेत. खरंतर त्या व्यक्तीला कसं पाहायचं? कसं मांडायचं? हे माझ्यासमोर अनेकदा प्रश्न उभे राहतात. काका म्हणून मांडायचं? व्यंगचित्रकार म्हणून मांडायचं की शिवसेनाप्रमुख हिंदुहृदयसम्राट म्हणून मांडायचं? त्यांच्यावर बोलायचं म्हटलं तर मी तुम्हाला शंभर टक्के सांगतो, मी आणि उद्धव तुमच्याशी तास न् तास बोलू शकतो, असं यावेळी राज ठाकरे यांनी म्हटलं आहे.

राज ठाकरे नेमकं काय म्हणाले? 

आज इथे बाळासाहेब असायला हवे होते असं म्हटलं होतं. आज गुलामांचा बाजार झाला आहे. हे सर्व महाराष्ट्रातील चित्र पाहिल्यानंतर आज मला वाटतं की बाळासाहेब नाहीत ते बरं आहे. तो माणूस किती व्यथित झाला असता त्या माणसाला काय त्रास झाला असता. हे चित्र समोर उभं राहिलं आहे महाराष्ट्रात. पूर्वी दोन शे वर्षापूर्वी चावडीवर उभं राहून माणसांचे लिलाव चालायचे. आजही ते लिलाव सुरू आहेत, कल्याण डोंबिवली ठाणे अशा अनेक ठिकाणी हे सर्व सुरू आहे.  उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्याशी बोलणं झालं, परिस्थिती पाहून  शिसारी आली, असा हल्लाबोल यावेळी राज ठाकरे यांनी सध्याच्या राजकीय परिस्थितीवर बोलताना केला आहे.

आज ही परिस्थिती पाहायला बाळासाहेब नाहीत ही चांगली गोष्ट आहे,  तो माणूस हे पाहूच शकला नसता. ज्या गोष्टी शून्यातून उभ्या केल्या. बाकीच्या पक्षात बघा, अनेक लोकं दिसतील जे बाळासाहेबांनी उभे केले आहेत. पण ज्या गोष्टी घडत जातात, घडत गेल्या, मी ज्यावेळी पक्षातून बाहेर पडलो त्याच्या वेदना वेगळ्या होत्या. माझ्यासाठी ते पक्ष सोडणं नव्हतं तर माझ्यसाठी घर सोडणं होतं. २० वर्षांचा काळ निघून गेला, अनेक गोष्टी मलाही उमजल्या, मला वाटतं अनेक गोष्टी उद्धव यांनाही उमजल्या असतील, असं यावेळी राज ठाकरे यांनी म्हटलं आहे.

Follow Us
तुषार गांधींना ताब्यात घेतल्याने राजकीय वातावरण तापलं! आदित्य ठाकरे...
तुषार गांधींना ताब्यात घेतल्याने राजकीय वातावरण तापलं! आदित्य ठाकरे, संजय राऊत पोलीस ठाण्यात दाखल
दिल्लीतील आंदोलकांच्या धरपकडीवर राज ठाकरे आक्रमक; सरकारवर साधला निशाणा
दिल्लीतील आंदोलकांच्या धरपकडीवर राज ठाकरे आक्रमक; सरकारवर साधला निशाणा
कधीकाळी ऐतिहासिक वारसा म्हणून ओळख; चालुक्यकालीन महादेव मंदिर बारव...
कधीकाळी ऐतिहासिक वारसा म्हणून ओळख; चालुक्यकालीन महादेव मंदिर बारव नष्ट होण्याच्या मार्गावर
इथे आजीचं निधन, तिथे अभिजीत दिपके पोलिसांच्या ताब्यात; अंत्यदर्शनाला..
इथे आजीचं निधन, तिथे अभिजीत दिपके पोलिसांच्या ताब्यात; अंत्यदर्शनालाही मुकणार, कुटुंबिय म्हणाले आता...
अरविंद केजरीवाल, सिसोदीया यांना ताब्यात घेतलं, दिल्लीतील आंदोलनात...
मोठी बातमी! अरविंद केजरीवाल, सिसोदीया यांना ताब्यात घेतलं, दिल्लीतील आंदोलनात धरपकड सुरूच
सोलापूरमध्ये दुष्काळाची भीषण स्थिती! 10 तालुक्यांत केंद्रीय पथकाची...
सोलापूरमध्ये दुष्काळाची भीषण स्थिती! 10 तालुक्यांत केंद्रीय पथकाची पाहणी, खरीप पिकांचे मोठे नुकसान
Mamata Banerjee | दिल्ली पोलिसांनी ममता बॅनर्जीना ताब्यात घेतलं
Mamata Banerjee | दिल्ली पोलिसांनी ममता बॅनर्जीना ताब्यात घेतलं, मोठं कारण समोर
नाशिकच्या कांदा उत्पादकांसाठी चिंतेची बातमी! येत्या काळात कांद्याचे दर
नाशिकच्या कांदा उत्पादकांसाठी चिंतेची बातमी! येत्या काळात कांद्याचे दर वाढणार?
कोल्हापूरच्या अंबाबाई दर्शनासाठी हायटेक नियोजन! QR कोड स्कॅन करताच...
कोल्हापूरच्या अंबाबाई दर्शनासाठी हायटेक नियोजन! QR कोड स्कॅन करताच मिळणार 'ही' सुविधा
काँग्रेसच्या काळातील SIRवर आक्षेप का नाही घेतला? - नितेश राणे
Nitesh Rane | काँग्रेसच्या काळातील SIRवर आक्षेप का नाही घेतला? - नितेश राणे