BAN vs PAK : सलमान अली आघाला मोठा झटका, आयसीसीकडून अशी कारवाई, काय झालं?

Bangladesh vs Pakistan 2nd Test : बांगलादेश क्रिकेट टीमने मायदेशात पाकिस्तानचा कसोटी मालिकेत धुव्वा उडवला. बांगलादेशने पाकिस्तानवर 2-0 ने मात केली. त्यानंतर आयसीसीने पाकिस्तानचा अनुभवी खेळाडू सलमान अली आघा याला मोठा झटका दिला आहे. जाणून घ्या कारण.

| Updated on: May 20, 2026 | 11:22 PM
1 / 5
आयसीसीने पाकिस्तानचा फलंदाज  सलमान अली आघा याला मोठा झटका दिला आहे. आयसीसीने आघाला आचारसंहितेचे उल्लंघन केल्याप्रकरणी दोषी ठरवलंय. आघाने आऊट झाल्यानंतर गैरवर्तन केलं होतं. त्यामुळे आघाच्या या वर्तनाची तक्रार सामनाधिकारी अर्थात मॅच रेफरीकडे करण्यात आली होती. (PC-GETTY IMAGES)

2 / 5
आघा दुसऱ्या डावात आऊट झाल्यानंतर जाहीरातीच्या बोर्डावर बॅट मारली होती. आघाने अशाप्रकारे अनुच्छेद 2.2 चं उल्लंघन केलं होतं. त्यामुळे आयसीसीने आघाला 1 डिमेरिट पॉइंट दिला आहे. (PC-GETTY IMAGES)

3 / 5
आघाने दुसऱ्या डावात 71 धावा केल्या होत्या. आघाने या दरम्यान मोहम्मद रिझवान याच्यासह 94 धावांची भागीदारी केली. मात्र त्यानंतरही हे दोघे पाकिस्तानला विजयी करण्यात अपयशी ठरले होते. बांगलादेशने हा सामना 78 धावांनी जिंकला होता. (PC-GETTY IMAGES)

4 / 5
बांगलादेशने पाकिस्तानला कसोटी मालिकेत दुसऱ्यांदा व्हाईट वॉश केलं. बांगलादेशने याआधी पाकिस्तानला त्यांच्याच घरात 2-0 ने लोळवलं होतं. त्यानंतर आता बांगलादेशने आपल्या घरात पाकिस्तानला 2-0 ने पराभूत केलं आहे. (PC-GETTY IMAGES)

5 / 5
बांगलादेशने सलग आणि एकूण दुसऱ्या विजयासह डब्ल्यूटीसी पॉइंट्स टेबलमध्ये मोठी झेप घेतली आहे. बांगलादेशने पॉइंट्स टेबलमध्ये पाकिस्तान आणि टीम इंडियाला पछाडलं आहे. बांगलादेशने पाचव्या स्थानी झेप घेतली आहे. तर टीम इंडियाची सहाव्या आणि पाकिस्तानची आठव्या स्थानी घसरण  झाली आहे. (PC-GETTY IMAGES)

Follow Us