
आयसीसी चॅम्पियन ट्रॉफी 2025 स्पर्धेचं आयोजन पाकिस्तानात आहे. त्यामुळे बीसीसीआय आणि पीसीबी यांच्यात आतापासून वाद सुरु झाला आहे. आशिया कप स्पर्धेत भारताने पाकिस्तानात खेळण्यास नकार दिला होता. त्यामुळे श्रीलंकेत काही सामने भरवण्यात आले होते.

दहशतवादानंतर भारताने पाकिस्तानशी सर्व संबंध तोडले आहेत. गेल्या काही वर्षांपासून द्विपक्षीय मालिकाही झालेल्या नाहीत. त्यामुळे भारतीय संघ पाकिस्तानात जात नाही. सध्या आयसीसी वर्ल्डकप स्पर्धा असल्याने पाकिस्तानला परवानगी देण्यात आली आहे.

आता आयसीसी चॅम्पियन स्पर्धेचं आयोजन पाकिस्तानात करण्यात आलं आहे. याबाबतचं धोरण आयसीसीने स्पष्ट केलं आहे. त्यामुळे भारतीय संघ पाकिस्तानात जाणार की नाही? असा प्रश्न आहे.

भारतीय संघ चॅम्पियन ट्रॉफीसाठी पात्र ठरला आहे. कारण भारताचं स्थान गुणतालिकेत टॉप सात मध्ये असणार आहे. त्यामुळे भारताने पाकिस्तानात जाण्यास नकार दिला तर कठीण होईल.

दुसरीकडे, पाकिस्तानकडून यजमानपद घेतलं जाऊ शकतं अशी चर्चा रंगली आहे. चॅम्पियन ट्रॉफीचं 2025 चं यजमानपद अमेरिका आणि वेस्ट इंडिजला मिळू शकतं.

इंग्लंड आणि बांगलादेशचं आयसीसी चॅम्पियन ट्रॉफीसाठी पात्र होणं खूपच कठीण दिसत आहे. पाकिस्तानकडे यजमानपद असल्याने थेट एन्ट्री आहे. पण इंग्लंडचं गुणतालिकेतील स्थान शेवटी असल्याने धाकधूक आहे.