Virat Kohli: आशिया चषक 2023 स्पर्धेपूर्वी किंग कोहली याच्या यो-यो टेस्टचा निकाल, काय आहे ते वाचा

Virat Kohli: टीम इंडियाचा स्टार फलंदाज विराट कोहली याची यो-यो टेस्ट नुकतीच पार पडली. या टेस्टमध्ये कोहलीला 17.2 गुण मिळाले असून पास झाला आहे. कोहलीने याबाबतची माहिती इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केली आहे.

| Updated on: Aug 24, 2023 | 5:41 PM
1 / 8
वनडे वर्ल्डकप स्पर्धेपूर्वी टीम इंडिया आशिया चषकासाठी सज्ज होत आहे. टीम इंडियाचे खेळाडू 30 ऑगस्टपासून सुरु होणाऱ्या आशिया कप स्पर्धेसाठी तयारी करत आहेत. 17 खेळाडूंच्या चमू बंगळुरूमधील एनसीएमध्ये सराव करण्यात व्यस्त आहेत. जेतेपदासाठी टीम इंडिया प्रमुख दावेदारांपैकी एक आहे.

2 / 8
एनसीएमध्ये सरावादरम्यान टीम इंडियाच्या सर्व खेळाडूंची फिटनेस तपासण्यासाठी यो-यो चाचणी केली जात आहे. या चाचणीत पास झालेल्या खेळाडूंना विश्वचषक संघात स्थान मिळण्याची दाट शक्यता आहे.दुसरीकडे, चाचणीत अपयशी ठरलेल्या खेळाडूंना आशिया कप स्पर्धेत बेंचवर बसावं लागू शकते.

3 / 8
टीम इंडियाचा स्टार फलंदाज विराट कोहली याचीही यो-यो टेस्ट झाली. या चाचणीत कोहलीला 17.2 गुण मिळाले असून पास झाला आहे. याबाबतची माहिती स्वत: कोहली याने इंस्टाग्रामवर शेअर केली आहे.

4 / 8
आशिया चषक संघात असलेले आणि आयर्लंडविरुद्ध नुकत्याच संपलेल्या तीन सामन्यांच्या टी20 मालिकेत खेळलेले भारतीय खेळाडू या चाचणीत सहभागी झाले. हार्दिक पांड्या आणि रवींद्र जडेजा यांना प्रत्येकी 19 गुण मिळाले. श्रेयस अय्यर आणि केएल राहुल यांच्या यो-यो टेस्टकडे नजर असेल.

5 / 8
वेस्ट इंडिजविरुद्धच्या कसोटी मालिकेनंतर विराट कोहली एकदिवसीय मालिकेतील फक्त एका सामन्यात खेळला. त्यानंतर कोहली मायदेशी परतला. त्यामुळे तेव्हापासून विश्रांती घेत असलेल्या कोहलीची आता यो-यो चाचणी झाली आहे.

6 / 8
भारतीय संघात निवडीसाठी यो-यो टेस्ट अनिवार्य केली पाहिजे,असं विराट कोहली कर्णधार असताना म्हणाला होता. त्यानंतर ही चाचणी टीम इंडियासाठी अनिवार्य करण्यात आली आहे. तसेच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील खेळाडूंच्या फिटनेसचे मोजमाप करण्यासाठी या चाचणीचा वापर बेंचमार्क म्हणून केला जातो.

7 / 8
यो-यो चाचणीमध्ये एकूण 23 टप्पे असतात. क्रिकेटपटूंसाठी पाचव्या टप्प्यातून चाचणी सुरू होते. यात प्रत्येक खेळाडूला प्रथम 20 मीटरचे अंतर कापत सुरुवातीच्या ठिकाणी परत यावं लागतं. म्हणजे एकूण 40 मीटर अंतर निर्धारित वेळेत पूर्ण करावे लागते.

8 / 8
पुढच्या टप्प्यात अंतर कापण्यासाठी लागणारा वेळही कमी होतो. याच्या आधारे, स्कोअर पूर्णपणे सॉफ्टवेअरमध्ये निश्चित केला जातो. यो-यो परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी किमान 16.1 गुण आवश्यक आहेत. यापेक्षा कमी गुण मिळवणाऱ्यांना नापास घोषित केले जातं.