
आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 फायनलमध्ये टीम इंडिया विरुद्ध न्यूझीलंड आमनेसामने असणार आहेत. रविवारी 9 मार्च रोजी हा सामना होणार आहे. या निमित्ताने आपण टीम इंडियासाठी आयसीसी स्पर्धेतील अंतिम सामन्यात सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या टॉप 5 गोलंदाजांबाबत जाणून घेणार आहोत. (Photo Credit : Bcci)

टीम इंडियाने 2017 साली चॅम्पियन्स ट्रॉफी फायनलमध्ये धडक दिली होती. पाकिस्तानने तेव्हा टीम इंडियाला अंतिम सामन्यात पराभूत केलं होतं. त्या सामन्यात भुवनेश्वर कुमार, हार्दिक पंड्या आणि केदार जाधव या त्रिकुटाने प्रत्येकी 1-1 विकेट घेतली होती. (Photo Credit : Bcci)

त्याआधी टीम इंडियाने 2013 साली चॅम्पियन्स ट्रॉफी फायनलमध्ये इंग्लंडचा धुव्वा उडवला होता. तेव्हा रवींद्र जडेजा, आर अश्विन आणि इशांत शर्मा या त्रिकुटाने प्रत्येकी 2-2 विकेट्स मिळवल्या होत्या. (Photo Credit : Ravindra Jadeja X Account)

टीम इंडियाने 2000 साली चॅम्पियन्स ट्रॉफी 2000 स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक दिली होती. न्यूझीलंडने तेव्हा भारताचा पराभव केला होता. तेव्हा वेंकटेश प्रसादने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या. होत्या. तर अनिल कुंबळे आणि झहीर खान या दोघांनी प्रत्येकी 1-1 विकेट घेतली होती. (Photo Credit : Bcci)

आयसीसी वनडे वर्ल्ड कप 2023 फायनलमध्ये जसप्रीत बुमराह याने ऑस्ट्रेलियाविरुद्ध 2 विकेट्स घेतल्या होत्या. तर मोहम्मद शमी आणि मोहम्मद सिराज या दोघांनी प्रत्येकी 1-1 विकेट घेतली होती. (Photo Credit : Bcci)

तर वनडे वर्ल्ड कप 2011 फायनलमध्ये श्रीलंकेविरुद्ध झहीर खान आणि युवराज सिंह या दोघांनी प्रक्येकी 2-2 विकेट्स घेतल्या होत्या. तर हरभजन सिंह याने 2003 वर्ल्ड कप फायनलमध्ये 2 फलंदाजांना बाद केलं होतं. तसेच 1983 वर्ल्ड कप फायनलमध्ये मदन लाल आणि मोहिंदर अमरनाथ या दोघांनी प्रत्येकी 3-3 विकेट्स घेतल्या होत्या. (Photo Credit : Shreyas Iyer X Account)