
बर्मिंगहॅममध्ये एका रंगारंग कार्यक्रमानं राष्ट्रकुल स्पर्धेला सुरुवात झाली. 30 हजार प्रेक्षकांच्या उपस्थितीत भव्य उद्घाटन सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं. या सोहळ्यात बर्मिंगहॅम देशाचा गौरवशाली इतिहास दाखवण्यात आला.

ब्रिटनच्या राणी एलिझाबेथ राष्ट्रकुल स्पर्धेच्या उद्घाटन सोहळ्याला उपस्थित राहू शकल्या नाही. त्यांच्या जागी प्रिन्स चार्ल्स यांनी मुकुटाचं प्रतिनिधित्व केलं. पत्नी कमिलासह स्वत: गाडी चालवत ते स्टेडियमवर पोहोचले.

उद्घाटन सोहळ्यात भारतीय संघाच्या प्रवेशानं संपूर्ण स्टेडियम दुमदुमून गेला. बॅडमिंटन स्टार पीव्ही सिंधू आणि हॉकी कर्णधार मनप्रीत सिंग यांनी संघाचं नेतृत्व केलं.

नोबेल पारितोषिक विजेती मलाला युसफाई हिनं सर्व खेळाडूंचं खेळात स्वागत केलं. मलालानं शिक्षण आणि शांतीचा संदेश दिला. मलाला तिच्या शस्त्रक्रियेपासून बर्मिंगहॅममध्ये स्थायिक झाली आहे आणि तिला तिचं घर मानते.

उद्घाटन समारंभात 10 मीटर लांबीचा बैल उभा करण्यात आला. त्याच्या मदतीनं बर्मिंगहॅमने आपला अनेक वर्षांचा संघर्ष दाखवला गेला. या शहरानं सर्व अडचणींवर कशी मात केली हे देखील दाखवून दिलं.