
पाकिस्तान टीमने आयसीसी वर्ल्ड कपमध्ये विजयी सलामी दिली. पाकिस्तानने नेदरलँड्सवर 87 धावांनी मात केली.

पाकिस्तानची या विजयासह 13 वर्षानंतर वर्ल्ड कपमधील प्रतिक्षा संपली. बाबर आझम याच्या कॅप्टन्सीत पाकिस्तानने ही कामगिरी केली.

पाकिस्तानला 2011 नंतर पहिल्यांदाच वनडे वर्ल्ड कपमधील आपला पहिला सामना जिंकण्यात यश आलं. पाकिस्तानने याआधी 2011 साली वर्ल्ड कपमध्ये विजयी सुरुवात केली होती.

वनडे वर्ल्ड कप 2011 स्पर्धेचं संयुक्त यजमानपद भारताकडे होतं. या स्पर्धेत पाकिस्तानने केन्या टीमचा पराभव केला होता.

दरम्यान पाकिस्तान आयसीसी वनडे वर्ल्ड कपमधील आपला दुसरा सामना हा श्रीलंका विरुद्ध खेळवण्यात येणार आहे. हा सामना मंगळवारी 10 ऑक्टोबरला पार पडणार आहे.