
एडलेड येथे झालेल्या सामन्यात सिडनी थंडरला एडलेड स्ट्रायकर्सकडून पराभव पत्करावा लागला . अॅडलेडच्या 166 धावांच्या लक्ष्याला प्रत्युत्तर देताना सिडनी थंडरने 159 धावा केल्या. अवघ्या 6 धावांनी पराभवाचं तोंड पाहावं लागलं. वॉर्नर आणि मॅथ्यू जिल्क्सने 10 षटकांत 73 धावा करत दमदार सुरुवात केली. पण विजय काही मिळवता आला नाही. (Photo- Getty)

कर्णधार वॉर्नरने सुरुवातीपासून शेवटपर्यंत आपली कामगिरी कायम ठेवली आणि संघ विजयाच्या जवळ पोहोचवलं. पण शेवटच्या षटकात सलग तीन चेंडू वाया घालवले. त्यामुळे शेवटी पराभवाचं तोंड पाहावं लागलं. डेविड वॉर्नरने या सामन्यात 51 चेंडूत नाबाद 67 धावांची खेळी केली. पण ती व्यर्थ गेली. (Photo- Sydney Thunder Twitter)

शेवटच्या षटकात सिडनी थंडरला 13 धावांची आवश्यकता होती. वॉर्नर स्ट्राईकवर होता आणि चांगलाच स्थिरावला होता. तो संघाला विजयाकडे नेईल असे वाटत होते. पण पुढे जे घडले ते सर्वांनाच आश्चर्यचकित करत होते. कारण त्याच्यामुळे पराभवाचं तोंड पाहावं लागलं. (Photo- Sydney Thunder Twitter)

ल्यूक वूडच्या षटक टाकण्यासाठी आला होता. वॉर्नरला पहिल्या तीन चेंडूंवर एकही धाव घेता आली नाही. चौथ्या चेंडूवर वॉर्नरला फक्त एक धाव मिळाली. पाचव्या चेंडूवर मॅकअँड्रयूने चौकार मारला. पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता. शेवटच्या चेंडूवर एक धाव आली आणि सिडनी थंडरने 6 धावांनी सामना गमावला. (Photo- Sydney Thunder Twitter)

कर्णधार वॉर्नरच्या बॅटमधून निघणाऱ्या धावाही विजयासाठी पुरेशा नाहीत, असं दिसत आहे. संघाच्या सातव्या सामन्यातही हीच स्थिती राहिली. कर्णधार वॉर्नरने सुरुवातीपासून शेवटपर्यंत आपली कामगिरी कायम ठेवली. पण शेवटच्या षटकात सलग तीन चेंडू वाया घालवले. (Photo- Sydney Thunder Twitter)