AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs ZIM Super 8 T20 WC Score Updates : भारताचा झिम्बाब्वेवर मोठा विजय, 72 धावांनी केलं पराभूत

| Updated on: Feb 27, 2026 | 3:08 AM
Share

India vs Zimbabwe, T20 world Cup 2026 hinglight Score Updates: भारताने सुपर 8 फेरीतील दुसऱ्या सामन्यात झिम्बाब्वेला 72 धावांनी पराभूत केलं. यासह झिम्बाब्वेचं या स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आलं आहे. तर दक्षिण अफ्रिका उपांत्य फेरीत पोहोचला आहे. आता दुसऱ्या संघासाठी भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात लढत असेल.

IND vs ZIM Super 8 T20 WC Score Updates : भारताचा झिम्बाब्वेवर मोठा विजय, 72 धावांनी केलं पराभूत
India vs Zimbabwe T20 world Cup 2026 Live ScoreImage Credit source: TV9

सुपर 8 फेरीच्या दुसऱ्या सामन्यात भारताने झिम्बाब्वेला 72 धावांनी पराभूत केलं आणि गणित सोपं केलं. भारताने झिम्बाब्वेसमोर विजयासाठी 256 धावांचं आव्हान दिलं होतं. हे आव्हान काही झिम्बाब्वेला गाठता आलं नाही. झिम्बाब्वेने 184 धावांपर्यंत मजल मारली आणि भारताने हा सामना 72 धावांनी जिंकला. गेल्या काही दिवसांपासून असलेलं जर तरचं सर्व गणित आता सुटलं आहे. भारताला उपांत्य फेरी गाठायची असेल तर आता वेस्ट इंडिजला पराभूत करावं लागणार आहे. भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात 1 मार्चला सामना होणार आहे.

LIVE Cricket Score & Updates

The liveblog has ended.
  • 26 Feb 2026 10:35 PM (IST)

    IND vs ZIM Super 8 T20 WC Live Score Updates : भारताचा झिम्बाब्वेवर मोठा विजय, 72 धावांनी केलं पराभूत

    भारताने झिम्बाब्वेविरुद्धचा सामना 72 धावांनी जिंकला आहे. भारताने विजयासाठी 256 धावांचं आव्हान दिलं होतं. पण झिम्ब्वाब्वेचा संघ 184 धावा करू शकला. या विजयासह भारताचं उपांत्य फेरीचं गणित सोपं झालं आहे. त्यामुळे उपांत्य फेरीचं गणित आता वेस्ट इंडिजविरुद्धच्या सामन्यावर अवलंबून असणार आहे.

  • 26 Feb 2026 10:32 PM (IST)

    IND vs ZIM Super 8 T20 WC Live Score Updates : संजू सॅमसनचा जबरदस्त झेल

    ताशिंगा मुसेकिवाच्या रुपाने झिम्बाब्वेला सहावा धक्का बसला आहे. शिवम दुबेच्या गोलंदाजीवर संजू सॅमसनने त्याचा जबरदस्त झेल पकडला. भारताच्या विजयाची औपचारिकता शिल्लक आहे.

  • 26 Feb 2026 10:24 PM (IST)

    IND vs ZIM Super 8 T20 WC Live Score Updates : टोनी मुनयोंगा त्रिफळाचीत, भारताचा विजय निश्चित

    झिम्बाब्वेला टोनी मुनयोंगाच्या रुपाने पाचवा धक्का बसला आहे. अर्शदीप सिंगने त्याचा त्रिफळा उडवला.  धावांचं अंतर भारताने हा सामना जिंकल्यात जमा आहे. आता फक्त काही औपचारिकता आहे.

  • 26 Feb 2026 10:13 PM (IST)

    IND vs ZIM Super 8 T20 WC Live Score Updates : कॅप्टन सिकंदर रजा मैदानातून वजा, झिंबाब्वेला तिसरा झटका

    अर्शदीप सिंह याने झिंबाब्वेला 17 व्या ओव्हरमध्ये तिसरा झटका दिला आहे. अर्शदीपने झिंबाब्वेचा कर्णधार सिकंदर रझा याला मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला. सिकंदरने 21 बॉलमध्ये 31 रन्स केल्या.

  • 26 Feb 2026 10:07 PM (IST)

    IND vs ZIM Super 8 T20 WC Live Score Updates : टीम इंडियाची सामन्यावर घट्ट पकड, झिंबाब्वेच्या किती धावा?

    झिंबाब्वेने टीम इंडिया विरुद्ध 257 धावांचा पाठलगा करताना 15 ओव्हरमध्ये 2 विकेट्स गमावून 131 रन्स केल्या आहेत.  सिकंदर रझा 19 तर ब्रायन बेनेट 78 रन्सवर नॉट आऊट खेळत आहेत.

  • 26 Feb 2026 09:53 PM (IST)

    IND vs ZIM Super 8 T20 WC Live Score Updates : ब्रायन बेनेटचं अर्धशतक, झिंबाब्वेची चिवट झुंज

    ब्रायन बेनेट याने जसप्रीत बुमराह याच्या बॉलिंगवर सिक्स ठोकत अर्धशतक झळकावलं आहे. ब्रायनने 34 बॉलमध्ये हे अर्धशतक झळकावलं. ब्रायनचं हे वर्ल्ड कप स्पर्धेतील 10 व्या पर्वातील तिसरं अर्धशतक ठरलं.

  • 26 Feb 2026 09:45 PM (IST)

    IND vs ZIM Super 8 T20 WC Live Score Updates : झिम्बाब्वेला दुसरा धक्का, डायन मायर्स आऊट

    वरुण चक्रवर्ती याने झिंबाब्वेला दुसरा झटका देत आपली पहिली विकेट मिळवली आहे. वरुणने डायन मायर्स याला तिलक वर्मा याच्या हाती कॅच आऊट केलं. डायन मायर्स याने 6 धावा केल्या.

  • 26 Feb 2026 09:30 PM (IST)

    IND vs ZIM Super 8 T20 WC Live Score Updates : झिम्बाब्वेला पहिला धक्का, अक्षर पटेलने मिळवून दिलं यश

    झिम्बाब्वेला मारूमनीच्या रूपाने पहिला धक्का बसला आहे. पावर प्लेनंतर अक्षर पटेलने पहिलं यश मिळवून दिलं आहे. मारूमनी 20 धावा करून तंबूत परतला आहे.

  • 26 Feb 2026 09:27 PM (IST)

    IND vs ZIM Super 8 T20 WC Live Score Updates : पावर प्लेमध्ये झिम्बाब्वेच्या बिनबाद 44 धावा

    झिम्बाब्वेने पावर प्लेमध्ये धीमी सुरूवात केली. सहा षटकात एकही गडी न गमवता 44 धावा केल्या आहेत. भारतीय गोलंदाजांची विकेटसाठी धडपड सुरू आहे.

  • 26 Feb 2026 09:18 PM (IST)

    IND vs ZIM Super 8 T20 WC Live Score Updates : टीम इंडियाची विकेटसाठी धडपड, झिम्बाब्वेची धीमी सुरुवात

    झिम्बाब्वेची टीम इंडियाविरुद्धच्या सामन्यात धीमी सुरूवात झाली आहे. भारताने पावर प्लेमध्ये पकड मिळवली आहे. भारताने विजयासाठी 256 धावांचं आव्हान दिलं आहे.

  • 26 Feb 2026 09:00 PM (IST)

    IND vs ZIM Super 8 T20 WC Live Score Updates : झिम्बाब्वेकडून बॅनेट आणि मारूमनी ही जोडी मैदानात

    झिम्बाब्वेकडून बॅनेट आणि मारूमनी ही जोडी मैदानात उतरली आहे. भारताने विजयासाठी 256 धावांचं आव्हान ठेवलं आहे. त्यामुळे ही जोडी कशी सुरूवात करते याकडे लक्ष लागून आहे. कारण आक्रमक खेळी करण्याशिवाय पर्याय नाही.

  • 26 Feb 2026 08:50 PM (IST)

    IND vs ZIM Super 8 T20 WC Live Score Updates : टीम इंडियाची तोडफोड बॅटिंग, झिंबाब्वे विरुद्ध 256 धावा, किती धावांनी जिंकणार?

    टीम इंडियाच्या पहिल्या 6 फलंदाजांची विस्फोटक बॅटिंग करत झिंबाब्वेच्या गोलंदाजांची धुलाई केली आहे. टीम इंडियाने 20 ओव्हरमध्ये 4 विकेट्स गमावून 256 धावा केल्या. अभिषेक शर्मा आणि हार्दिक पंड्या या दोघांनीही अर्धशतक झळकावलं. तर संजू सॅमसन, इशान किशन, सूर्यकुमार यादव आणि तिलक वर्मा या चौघांनीही 20 पेक्षा अधिक धावा करत भारताला 250 पोहचवण्यात योगदान दिलं. त्यामुळे आता टीम इंडिया झिंबाब्वे विरुद्ध किती धावांनी जिंकणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

  • 26 Feb 2026 08:35 PM (IST)

    IND vs ZIM Super 8 T20 WC Live Score Updates : टीम इंडिया 200 पार, आणखी किती धावा करणार?

    टीम इंडियाने 200 पार मजल मारली आहे. तिलक वर्मा आणि हार्दिक पंड्या ही जोडी मैदानात खेळत आहे. दोघेही जोरदार फटकेबाजी करत आहे.  भारताने 18 ओव्हरमध्ये 4 विकेट्स गमावून 220 धावा केल्या आहेत.  त्यामुळे आता टीम इंडिया उर्वरित 2 षटकांत आणखी किती धावा करणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

  • 26 Feb 2026 08:21 PM (IST)

    IND vs ZIM Super 8 T20 WC Live Score Updates : कॅप्टन सूर्यकुमार यादव आऊट, भारताला चौथा झटका

    झिंबाब्वेने भारताला चौथा आणि सर्वात मोठा झटका दिला आहे. भारताचा कर्णधार सूर्यकुमार यादव आऊट झाला आहे. सूर्याने 13 बॉलमध्ये 33 रन्स केल्या.

  • 26 Feb 2026 08:11 PM (IST)

    IND vs ZIM Super 8 T20 WC Live Score Updates : टीम इंडियाला तिसरा झटका, अभिषेक शर्मा माघारी

    झिंबाब्वेने टीम इंडियाला मोठा झटका दिला आहे. ओपनर अभिषेक शर्मा अर्धशतक करुन आऊट झाला आहे. अभिषेकने 30 बॉलमध्ये 4 सिक्स आणि 4 फोरसह एकूण 55 धावा केल्या.

  • 26 Feb 2026 07:54 PM (IST)

    IND vs ZIM Super 8 T20 WC Live Score Updates : इशान किशन आऊट, सिकंदर रझाकडून शिकार, टीम इंडियाला दुसरा झटका

    झिंबाब्वेचा कर्णधार सिकंदर रझा इशान किशन याला आऊट करत भारताला दुसरा झटका दिला आहे. सिकंदरने त्याच्या बॉलिंगवर इशान किशन याला रिचर्ड नगारावा याच्या हाती कॅच आऊट केलं. इशानने 38 धावा केल्या.

  • 26 Feb 2026 07:45 PM (IST)

    IND vs ZIM Super 8 T20 WC Live Score Updates : पावरप्ले टीम इंडियाच्या नावावर, झिंबाब्वे विरुद्ध 80 धावा

    टीम इंडियाने पावरप्ले आपल्या नावावर केला आहे. टीम इंडियाने 6 ओव्हरमध्ये 1 विकेट गमावून 80 धावा केल्या. इशान किशन 15 तर अभिषेक शर्मा 33 धावांवर नाबाद खेळत आहेत.

  • 26 Feb 2026 07:23 PM (IST)

    IND vs ZIM Super 8 T20 WC Live Score Updates : टीम इंडियाला पहिला झटका, संजू सॅमसन आऊट

    झिंबाब्वेने संजू सॅमसन-इशान किशन ही टीम इंडियाची सेट आणि ओपनिंग जोडी फोडली आहे. ब्लेसिंग मुजारबानी याने संजूला रायन बर्ल याच्या हाती कॅच आऊट केलं. संजूने 15 बॉलमध्ये 24 रन्स केल्या. भारताने 3.4 ओव्हरमध्ये 1 विकेट गमावून 48 धावा केल्या आहेत.

  • 26 Feb 2026 07:07 PM (IST)

    IND vs ZIM Super 8 T20 WC Live Score Updates : संजूची कडक ओपनिंग, टीम इंडियाची जबरदस्त सुरुवात

    टीम इंडियाचा फलंदाज आणि ओपनर संजू सॅमसन याने झिंबाब्वे विरुद्ध अप्रतिम सुरुवात केली आहे. संजूने इशान किशन याच्यासोबत पहिल्या ओव्हरमध्ये 13 धावा जोडल्या. संजूने या दरम्यान 1 सिक्स लगावला. तर एक चौकारही लगावला. मात्र तो चौकार लेग बिफोर असल्याने संजूच्या खात्यात जोडला गेला नाही. मात्र संजूने केलेल्या या सुरुवातीमुळे भारताच्या डग आऊटमध्ये आनंदाचं वातावरण आहे.

  • 26 Feb 2026 06:46 PM (IST)

    IND vs ZIM Super 8 T20 WC Live Updates : झिंबाब्वे प्लेइंग ईलेव्हन

    तादिवानाशे मारुमणी (विकेटकीपर), ब्रायन बेनेट, डायन मायर्स, रायन बर्ल, सिकंदर रझा (कॅप्टन), टोनी मुन्योंगा, ताशिंगा मुसेकिवा, ब्रॅड इव्हान्स, टिनोटेंडा मापोसा, ब्लेसिंग मुझाराबानी आणि रिचर्ड नागरावा.

  • 26 Feb 2026 06:43 PM (IST)

    IND vs ZIM Super 8 T20 WC Live Updates : भारताची प्लेइंग ईलेव्हन

    संजू सॅमसन (विकेटकीपर), अभिषेक शर्मा, इशान किशन, सूर्यकुमार यादव (कर्णधार), तिलक वर्मा, हार्दिक पंड्या, शिवम दुबे, अक्षर पटेल, अर्शदीप सिंग, वरुण चक्रवर्ती आणि जसप्रीत बुमराह.

  • 26 Feb 2026 06:37 PM (IST)

    IND vs ZIM Super 8 T20 WC Live Updates : झिंबाब्वेने टॉस जिंकला, टीम इंडिया विरुद्ध निर्णय काय?

    झिंबाब्वेने सुपर 8 मधील दुसऱ्या सामन्यात टीम इंडिया विरुद्ध टॉस जिंकला आहे. कॅप्टन सिकंदर रझा याने फिल्डिंगचा निर्णय घेत टीम इंडियाला बॅटिंगसाठी भाग पाडलं आहे. त्यामुळे टीम इंडिया आता किती धावा करणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

  • 26 Feb 2026 06:26 PM (IST)

    IND vs ZIM Super 8 T20 WC Live Updates : थोड्याच मिनिटांत टॉस, कोण जिंकणार?

    टीम इंडिया विरुद्ध झिंबाब्वे सुपर 8 सामन्याला संध्याकाळी 7 वाजता सुरुवात होणार आहे. त्याआधी 6 वाजून 30 मिनिटांनी टॉस होणार आहे. नाणेफेकीचा कौल कोणत्या संघाच्या बाजूने लागणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

  • 26 Feb 2026 06:10 PM (IST)

    IND vs ZIM Super 8 T20 WC Live Updates : टी 20i वर्ल्ड कप 2026 स्पर्धेसाठी टीम झिंबाब्वे

    तादिवानाशे मारुमणी (विकेटकीपर), ब्रायन बेनेट, डायन मायर्स, रायन बर्ल, सिकंदर रझा (कर्णधार), टोनी मुन्योंगा, ताशिंगा मुसेकिवा, ब्रॅड इव्हान्स, ग्रॅमी क्रेमर, आशीर्वाद मुझाराबानी, रिचर्ड नगारावा, बेन कुरन, क्लाइव्ह मदांडे, टिनोटेंडा मापोसा आणि वेलिंग्टन मसाकादझा.

  • 26 Feb 2026 06:08 PM (IST)

    IND vs ZIM Super 8 T20 WC Live Updates : टी 20i वर्ल्ड कप 2026 स्पर्धेसाठी टीम इंडिया

    इशान किशन (विकेटकीपर), अभिषेक शर्मा, तिलक वर्मा, सूर्यकुमार यादव (कर्णधार), वॉशिंग्टन सुंदर, शिवम दुबे, हार्दिक पांड्या, रिंकू सिंग, अर्शदीप सिंग, वरुण चक्रवर्ती, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, अक्षर पटेल, कुलदीप यादव आणि संजू सॅमसन.

  • 26 Feb 2026 06:04 PM (IST)

    IND vs ZIM Super 8 T20 WC Live Updates : टीम इंडिया-झिंबाब्वे सामना, सुपर 8 मध्ये कोण जिंकणार?

    टीम इंडिया आणि झिंबाब्वेची सुपर 8 मध्ये पराभवाने सुरुवात झाली. त्यामुळे आता दोन्ही संघांसाठी एकमेकांविरूद्धचा सुपर 8 मधील सामना हा करो या मरो असा झाला आहे. या सामन्यात पराभूत होणाऱ्या संघाचं पॅकअप होईल. तर विजयी संघाचं आव्हान कायम राहिल. त्यामुळे या सामन्यात कोण कशी कामगिरी करतं हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

Published On - Feb 26,2026 5:59 PM

Follow Us
गोरेगाव ड्रग्स प्रकरणात अपडेट: प्रसिद्ध इन्फ्लुएन्सरची पार्टीला हजेरी
गोरेगाव ड्रग्स प्रकरणात अपडेट: प्रसिद्ध इन्फ्लुएन्सरची पार्टीला हजेरी.
अशोक खरात प्रकरणात नवीन नाव समोर, बडा नेता कोण? दमानिया म्हणाल्या....
अशोक खरात प्रकरणात नवीन नाव समोर, बडा नेता कोण? दमानिया म्हणाल्या.....
चाकणकरांचे शेकडो कॉल्स का? अंजली दमानियांचे गंभीर आरोप
चाकणकरांचे शेकडो कॉल्स का? अंजली दमानियांचे गंभीर आरोप.
आदित्य ठाकरे कार्याध्यक्ष होणार?; संजय राऊत म्हणाले अधिकृत निर्णय नाही
आदित्य ठाकरे कार्याध्यक्ष होणार?; संजय राऊत म्हणाले अधिकृत निर्णय नाही.
महिला आरक्षणावर ठाकरेंची शिवसेना ठाम; मिस कॉलवर राऊतांचे प्रत्युत्तर
महिला आरक्षणावर ठाकरेंची शिवसेना ठाम; मिस कॉलवर राऊतांचे प्रत्युत्तर.
प्रतिभा चाकणकरांची चौकशी, रुपाली चाकणकरांना नोटीस का नाही?
प्रतिभा चाकणकरांची चौकशी, रुपाली चाकणकरांना नोटीस का नाही?.
अमरावतीत प्रेमाच्या जाळ्यात अडकवून तरुणींचे लैंगिक शोषण?
अमरावतीत प्रेमाच्या जाळ्यात अडकवून तरुणींचे लैंगिक शोषण?.
हा देश कोणाच्या मर्जीने नाही बाबासाहेबांच्या संविधानाने चालणार - सुळे
हा देश कोणाच्या मर्जीने नाही बाबासाहेबांच्या संविधानाने चालणार - सुळे.
अशोक खरात प्रकरणात मोठा खुलासा; भक्तांच्या कागदपत्रांचा गैरवापर
अशोक खरात प्रकरणात मोठा खुलासा; भक्तांच्या कागदपत्रांचा गैरवापर.
शिर्डी पोलिसांकडून प्रतिभा चाकणकर यांची तब्बल 8 तास कसून चौकशी
शिर्डी पोलिसांकडून प्रतिभा चाकणकर यांची तब्बल 8 तास कसून चौकशी.