
विराट कोहली याने दिल्ली कॅपिट्ल्स विरुद्ध 55 धावांची अर्धशतकी खेळी केली. विराटने यासह अनेक विक्रम आपल्या नावावर केले.

विराट कोहली याचं दिल्ली विरुद्धचं अर्धशतक हे त्याच्या आयपीएल कारकीर्दीतील 50 वं अर्धशतक ठरलं. विराट अर्धशतकांचं अर्धशतक पूर्ण करणारा पहिला फलंदाज ठरला.

तसेच विराटने दिल्ली विरुद्ध 12 धावा पूर्ण करताच आयपीएलमध्ये 7 हजार धावांचा टप्पा पार केला. विराट आयपीएलमध्ये अशी कामगिरी करणारा पहिला फलंदाज ठरला. विराटच्या नावावरच आयपीएलमध्ये सर्वाधिक धावांचा विक्रम आहे.

तसेच विराटने या खेळीदरम्यान दिल्ली विरुद्ध 1 हजार धावाही पूर्ण केल्या. अशाप्रकारे विराटने एका खेळीसह एकूण 3 विक्रम आपल्या नावावर केले.