
श्रीलंकेने तिसऱ्या टी20 सामन्यात 112 धावा केल्या आणि विजयासाठी 113 धावा दिल्या. हे आव्हान भारताने 13.2 षटकात 2 गडी गमवून गेल्या. या सामन्यात दीप्ती शर्माने फिरकी कौशल्य दाखवले आणि 4 षटकांत फक्त 18 धावांत 3 विकेट्स घेतल्या. (Photo- BCCI Women Twitter)

दीप्ती शर्माने या विकेटसह टी20 मध्ये 150 विकेट घेतल्या आहेत. अशी कामगिरी करणारी पहिली भारतीय गोलंदाज ठरली. जागतिक स्तरावर मेगन शट नंतर ही कामगिरी करणारी ती दुसरी गोलंदाज आहे. शटने 122 डावांमध्ये 151 विकेट घेतल्या आणि दीप्तीने128 डावात ही कामगिरी केली. (Photo- BCCI Women Twitter)

दीप्ती शर्माने केवळ टी20 मध्येच नाही तर एकदिवसीय सामन्यांमध्येही 150हून अधिक विकेट घेतल्या आहेत. दीप्तीने एकदिवसीय सामन्यांमध्ये 2000हून अधिक धावा केल्या आहेत. (Photo- BCCI Women Twitter)

दीप्ती शर्माने सर्वाधिक आंतरराष्ट्रीय विकेट्समध्ये ऑस्ट्रेलियाची दिग्गज अष्टपैलू एलिस पेरी हिला मागे टाकले आहे. दीप्तीने 256 डावांमध्ये 333 आंतरराष्ट्रीय विकेट्स घेतल्या आहेत. पेरीच्या नावावर 331 विकेट्स आहेत. (Photo- BCCI Women Twitter)

झुलन गोस्वामीच्या नावावर 355 विकेट असून सर्वाधिक आंतरराष्ट्रीय विकेट्सचा विक्रम आहे. हा विक्रमही दीप्ती शर्मा लवकरच मोडेल असं दिसत आहे. (Photo- BCCI Women Twitter)