
आयपीएल 2026 स्पर्धेला 28 मार्चपासून सुरुवात होत आहे. पण मागच्या 18पर्वात अनेक विक्रमांची नोंद झाली आहे. हे या लीगचं यश आहे असं म्हंटलं तर वावगं ठरणार नाही. असाच एक विक्रम 16 खेळाडूंच्या नावावर आहे. आयपीएलच्या इतिहासात आतापर्यंत झालेल्या 18 अंतिम सामन्यांमध्ये खेळाडूंनी कधीही अंतिम सामना गमावलेला नाही. (Photo- IPL/BCCI)

रोहित शर्माने सर्वाधिक आयपीएल फायनल जिंकल्या आहेत. रोहित शर्माने सहा वेळा फायनल खेळून प्रत्येक वेळी विजय मिळवला आहे. रोहित शर्मा आयपीएल फायनलच्या इतिहासातील सर्वाधिक अपराजित खेळाडू आहे. रोहितने मुंबई इंडियन्सकडून पाच वेळा आणि डेक्कन चार्जर्सकडून एकदा आयपीएल फायनल खेळली आहे.

रोहित शर्मानंतर दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या अष्टपैलू कृणाल पांड्याच्या नावावर आयपीएल फायनलमध्ये सर्वाधिक विजय मिळवण्याचा विक्रम आहे. त्याने चार वेळा आयपीएल फायनल खेळली असून प्रत्येक वेळी विजय मिळवला आहे. गतविजेत्या आरसीबी संघाचा भाग होता हे विशेष

कृणाल पांड्यानंतर जसप्रीत बुमराह आणि सूर्यकुमार यादव यांचाही या यादीत समावेश आहे. या दोन्ही खेळाडूंनी तीन वेळा आयपीएलचा अंतिम सामना खेळला आणि तिन्ही वेळा विजेतेपद पटकावले आहे.

उर्वरित खेळाडूंमध्ये क्विंटन डी कॉक, ऋतुराज गायकवाड, गौतम गंभीर, जोश हेझलवूड, ईशान किशन, मॅकक्लेनघन, प्रज्ञान ओझा, करण शर्मा, लेंडल सिमन्स, यश दयाल, मोईन अली आणि डग बोलिंगर यांचा समावेश आहे. यांनी प्रत्येकी दोनदा आयपीएलचा अंतिम सामना खेळून ते सामने जिंकले आहेत. (सर्व फोटो- टीव्ही 9 कन्नडवरून)