
शुबमन गिल याने लीड्समध्ये इंग्लंड विरुद्ध कर्णधार म्हणून पहिल्याच सामन्यात शतक केलं. शुबमन या शतकासह कर्णधार म्हणून पदार्पणात चमकला. मात्र सामन्यातील पाचव्या दिवशी कॅप्टन शुबमन अडचणीत सापडला. नक्की काय झालं? जाणून घेऊयात. (Photo Credit : Getty Images)

इंग्लंडने सामन्यातील पाचव्या दिवशी टीम इंडियाच्या गोलंदाजांविरुद्ध मनसोक्त बॅटिंग केली आणि धावा केल्या. बेन डकेट आणि झॅक क्रॉली या सलामी जोडीने 188 रन्सची पार्टनरशीप केली आणि टीम इंडियाला बॅकफुटवर ढकललं. या सलामी जोडीच्या बॅटिंगदरम्यान कॅप्टन गिलवर आरोप करायला सुरुवात झाली. (Photo Credit : Getty Images)

शुबमन गिल याने इंग्लंड विरुद्ध आक्रमक फिल्डिंग सेट केली नाही, त्यामुळे इंग्लंडच्या सलामी जोडीने सहज धावा केल्या, असा आरोप भारतीय कर्णधारावर करण्यात आला आहे. (Photo Credit : Getty Images)

"शुबमन गिल याने पहिल्या डावाप्रमाणे फार वाईट नेतृत्व केलं. शुबमनने इंग्लंडला पहिल्या डावात काळे ढग दाटले असूनही 460 पेक्षा अधिक धावा करुन दिल्या. तर आता इंग्लंड 371 विजयी धावांचा पाठलाग करत असताना शुबमनने डिफेन्सिव्ह फिल्डिंग सेट केली आहे. विराट कोहली हे सर्व पाहून संतापला असेल", असं एका नेटकऱ्याने एक्स पोस्टद्वारे म्हटलं आहे. (Photo Credit : Getty Images)

दरम्यान इथे कर्णधार म्हणून एकटा शुबमन जबाबदार नाही. टीम इंडियाच्या 4 खेळाडूंनी पहिल्या डावात 6 कॅचेस सोडल्या. त्यामुळे टीम इंडिया पहिल्या डावात 471 रन्स करुनही मोठी आघाडी घेण्यात अपयशी ठरली. तर दुसऱ्या डावातही टीम इंडियाने बेन डकेटचा कॅच सोडला. डकेटने याचा फायदा घेत शतक ठोकलं. (Photo Credit : Getty Images)