Team India : सूर्यांश शेडगेचं टी 20i नंतर वनडे डेब्यु;ऑलराउंडरच्या दुखापतीमुळे मुंबईकर खेळाडूला संधी?

England vs India Odi Series 2026 : नितीश कुमार रेड्डी याच्या जागी आयर्लंड विरूद्धच्या टी 20i मालिकेत सूर्यांश शेडगे याला संधी देण्यात आली होती. आता दावे खरे ठरल्यास सूर्यांशचं एकदिवसीय पदार्पण होऊ शकतं.

| Updated on: Jun 30, 2026 | 4:17 PM
1 / 5
आयर्लंड विरुद्ध टी 20i मालिका गमावल्यानंतर टीम इंडिया इंग्लंडमध्ये पोहचली आहे. टीम इंडिया इंग्लंड विरुद्ध 1 जुलैपासून 5 सामन्यांची टी 20i मालिका खेळणार आहे. त्यानंतर उभसंघात 3 सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेचा थरार रंगणार आहे. मात्र त्याआधी टीम इंडियाच्या गोटातून चिंताजनक बाब समोर आली आहे. (PC-PTI)

2 / 5
मीडिया रिपोर्ट्सनुसार, टीम इंडियाचा ऑलराउंडर नितीश कुमार रेड्डी याला दुखापतीमुळे एकदिवसीय मालिकेला मुकावं लागू शकतं. एकदिवसीय मालिकेला 14 जुलैपासून सुरुवात होणार आहे. नितीशची तोवर फिट होण्याची शक्यता कमी आहे.  (PC-PTI)

3 / 5
मीडिया रिपोर्ट्सनुसार, नितीश सध्या बंगळुरुतील सीओईमध्ये आहे. मात्र नितीशने अजूनही रिहॅबला सुरुवात केलेली नाही. नितीशला आधीच दुखापतीमुळे  आयर्लंड आणि इंग्लंड विरूद्धच्या टी 20i मालिकेतून बाहेर व्हावं लागलं आहे. (PC-PTI)

4 / 5
रिपोर्ट्सनुसार, नितीशचं आता झिंबाब्वे विरुद्ध कमबॅक होऊ शकतं. टीम इंडिया झिंबाब्वे विरुद्ध 3 सामन्यांची टी 20i मालिका खेळणार आहे. भारतीय संघ या दौऱ्यासाठी झिंबाब्वे दौऱ्यावर जाणार आहे. (PC-PTI)

5 / 5
आता नितीश वनडे टीममधून बाहेर झाल्यास त्याच्या जागी कुणाला संधी मिळणार? हा प्रश्न उपस्थित होतो. अनुभवी ऑलराउंडर हार्दिक पंड्या हा देखील या मालिकेत खेळणार नाहीय. त्यामुळे नितीशच्या जागी मुंबईकर सूर्यांश शेडगे याला संधी मिळू शकते. सूर्यांशचं आयर्लंड विरुद्ध टी 20i मालिकेतून आंतरराष्ट्रीय पदार्पण झालं. त्यामुळे आता नितीशच्या जागी सूर्यांशला संधी मिळाल्यास त्याची एकदिवसीय पदार्पणाची शक्यता वाढेल. (PC-PTI)

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us