ऑस्ट्रेलियाला त्यांच्याच भूमीत पराभूत करून इंग्लंडने केली भारताची बरोबरी, नेमकं काय केलं जाणून घ्या

एशेज कसोटी मालिकेतील चौथ्या सामन्यात इंग्लंडने ऑस्ट्रेलियाचा 4 गडी राखून पराभव केला. इंग्लंडने 14 वर्षानंतर ऑस्ट्रेलियाच्या भूमीत कसोटी सामना जिंकला. यासह भारताच्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमधील विक्रमाची बरोबरी केली.

| Updated on: Dec 27, 2025 | 4:54 PM
1 / 5
एशेज कसोटी मालिकेतील सुरुवातीच्या तीन सामन्यात इंग्लंडला पराभवाचं तोंड पाहावं लागलं. एक तर मालिका गमावली आणि व्हाईट वॉशचं सावट होतं. पण चौथ्या कसोटी सामन्यात इंग्लंडने ऑस्ट्रेलियाचा 4 गडी राखून पराभव केला. 14 वर्षानंतर ऑस्ट्रेलियात विजय मिळवला. यापूर्वी 2011 मध्ये इंग्लंडने ऑस्ट्रेलियात विजय मिळवला होता. (Photo- England Cricket Twitter)

2 / 5
इंग्लंडने या विजयासह आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये सर्वाधिक विजय मिळवणाऱ्या संघाच्या यादीत संयुक्तपणे दुसऱ्या स्थानी झेप घेतली आहे. दोन्ही संघांनी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये एकूण 35 सामने जिंकले आहेत. तर ऑस्ट्रेलियाने एकूण 39 सामने जिंकून वर्ल्ड टेस्ट कॉमेडीमध्ये सर्वाधिक विजय मिळवण्याचा विक्रम केला आहे. (Photo- England Cricket Twitter)

3 / 5
इंग्लंडने ऑस्ट्रेलियन भूमीवर 14 वर्षांन कसोटी सामना जिंकला आहे. याआधी अँड्र्यू स्ट्रॉसने जानेवारी 2011 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध ऑस्ट्रेलियात कसोटी सामना जिंकणाऱ्या तत्कालीन इंग्लंड संघाचे नेतृत्व केले होते. त्या कसोटी सामन्यात अ‍ॅलिस्टर कुकने 18 धावांची शानदार खेळी केली. तेव्हापासून इंग्लंडने कांगारूंच्या भूमीवर एकही कसोटी सामना जिंकला नव्हता. (Photo- England Cricket Twitter)

4 / 5
इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियन संघ 152 धावांवर सर्वबाद झाला. इंग्लंडकडून टोंगने पाच विकेट घेतल्या होत्या. तर इंग्लंडचा संघही पहिल्या डावात फक्त 110 धावांवर सर्वबाद झाला. अशाप्रकारे, ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात 42 धावांची आघाडी घेतली. (Photo- England Cricket Twitter)

5 / 5
दुसऱ्या डावात इंग्लंडने शानदार गोलंदाजी केली आणि ब्रायडन कार्सने चार आणि बेन स्टोक्सने तीन बळी घेतले. ऑस्ट्रेलियाचा संघ 132 धावांतच संपला आणि इंग्लंडसमोर विजयासाठी 175 धावांचे लक्ष्य ठेवले. या लक्ष्याचा पाठलाग करताना इंग्लंडला जॅक क्रॉली (37), बेन डकेट (34) आणि जेकब बेथेल (40) यांनी महत्त्वपूर्ण खेळी करत संघाला विजय मिळवून दिला. (Photo- England Cricket Twitter)