
मुल्तान कसोटीत जो रुट आणि हॅरी ब्रूक यांनी पाकिस्तान गोलंदाजांचा घाम काढला. विक्रम भागीदारीसह जो रूटने द्विशतक, तर हॅरी ब्रूकने त्रिशतक ठोकलं. जो रूटने 305 चेंडूत 200 धावा केल्या. तसेच एका विक्रमाला गवसणी घातली आहे.

पाकिस्तानविरुद्ध झळकावलेलं द्विशतक हे जो रूटच्या कसोटी कारकिर्दितील सहावं द्विशतक आहे. यासह त्याने मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याच्या विक्रमाची बरोबरी केली आहे. सचिनने 329 कसोटी डावात 6 द्विशतकं ठोकली आहेत. तसेच द्विशतक झळकावणाऱ्या खेळाडूंच्या यादीत सातवं स्थान पटकावलं आहे.

जो रूटने 268 व्या कसोटी डावात एकूण सहा द्विशतक ठोकली आहे. आता या द्विशतकासह जो रूटने द्विशतकं झळकावणाऱ्या फलंदाजांच्या यादीत सातव्या स्थानावर पोहोचला आहे. सचिन आणि जो रूट या दोघांचे आता कसोटी सात द्विशतकं झाली आहेत.

कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक द्विशतकं ठोकण्याचा विक्रम ऑस्ट्रेलियाच्या डॉन ब्रॅडमनच्या नावावर आहे. त्याने 80 डावात 12 द्विशतकं झळकावली आहेत. हा विश्वविक्रम गेल्या अनेक वर्षांपासून अभेद्य आहे.

सहा द्विशतकांसह जो रूटच्या नावावर आणखी एका विक्रमाची नोंद झाली आहे. इंग्लंडसाठी सर्वाधिक कसोटी धावा करण्याचा विक्रम त्याच्या नावावर झाला आहे. जो रूटने 12500+ धावा केल्या आहेत.