
भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी याचा आज वाढदिवस आहे.. टीम इंडियाचा हा दिग्गज 42 वर्षांचा झालाय... आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून संन्यास घेतल्यानंतर महेंद्रसिंग धोनीचा हा पहिलाच वाढदिवस आहे... 2020 साली त्याने आपल्या क्रिकेट कारकीर्दीला पूर्णविराम दिला. धोनीच्या 40 व्या वाढदिवसानिमित्त आपण त्याच्या काही खास इनिंग्जवर नजर टाकूया... धोनीला टी-20 क्रिकेट आणि वन-डे क्रिकेटचा बादशहा म्हणून ओळखलं जातं परंतु कसोटी क्रिकेटमध्ये देखील त्यांना लाजवाब खेळी खेळल्या आहेत... 2013 मध्ये त्यानं ऑस्ट्रेलियाविरुद्ध चेन्नई टेस्टमध्ये दुहेरी शतक झळकावलं होतं... अशी कमाल करणारा तो एकमेव विकेट किपर फलंदाज आहे... धोनीने खेळलेल्या 90 कसोटीत 38.09 च्या सरासरीनं 4 हजार 876 रन्स केले आहेत. कसोटी क्रिकेटमध्ये धोनीच्या नावावर 6 शतकांसह 33 अर्धशतकं आहेत. चला तर मग जाणून घेऊया धोनीच्या पाच सर्वोत्तम इनिंग्जविषयी...

धोनीने डिसेंबर 2005 मध्ये श्रीलंकेविरुद्धच्या दुसर्या कसोटी सामन्यात नाबाद 51 धावा केल्या. तिसर्या डावात दिल्लीमध्ये खेळल्या गेलेल्या या सामन्यात धोनी आठव्या क्रमांकावर फलंदाजीला आला. त्यावेळी भारताला वेगवान धावांची आवश्यकता होती. अशा परिस्थितीत धोनीने केवळ 51 चेंडूत 5 चौकार आणि 2 षटकारांसह नाबाद 51 धावा केल्या. यासह भारताने 6 बाद 375 धावांवर डाव घोषित केला. श्रीलंकेला विजयासाठी 436 धावांचं लक्ष्य मिळालं. हा सामना भारताने 188 धावांनी जिंकला.

एमएस धोनीने पाकिस्तानविरुद्धच्या कारकिर्दीतील अनेक चमकदार खेळी खेळली. पाकिस्तानविरुद्ध त्याने वन डे आणि कसोटी फॉरमॅटमध्ये कारकिर्दीतील पहिले शतक झळकावलं. कसोटी फॉरमॅटमधील त्याचं पहिलं शतक जानेवारी 2006 मध्ये फैसलाबाद इथं आलं. या सामन्यात प्रथम खेळताना पाकिस्तानने 588 धावा केल्या. जेव्हा भारताची फलंदाजी आली तेव्हा भारतीय फलंदाजांनीही मोठे डाव खेळले. 281 धावांच्या मोबदल्यात पाच विकेट पडल्यानंतर लवकरच भारताचा डाव संपेल, असं वाटत होतं, पण धोनीने एक बाजू लावून धरली होती. घेतला. त्याने इरफान पठाणसह 210 धावा जोडल्या. या दरम्यान धोनीने आपल्या कारकिर्दीतील पहिले कसोटी शतक पूर्ण केले. त्याने 153 चेंडूत 19 चौकार आणि चार षटकारांसह 148 धावा केल्या. पहिल्या डावात भारताने 603 धावा केल्या. हा सामना ड्रॉ झाला.

कारकिर्दीच्या सुरुवातीच्या काळात महेंद्रसिंग धोनीने वेस्ट इंडिज दौर्यावर स्फोटक खेळी केली. जून 2006 मध्ये भारताच्या दुसर्या डावात त्याने 52 चेंडूंत 4 चौकार आणि 6 षटकारांसह 69 धावा केल्या. तो ज्या चेंडूवर ईऊट झाला तो ही बॉल सीमारेषेपार पोहोचत होता डॅरेन गंगाने अप्रतिम झेल पकडला. या कॅचवरुन बराच गोंधळही. हे रिप्लेमध्ये स्पष्टपणे दिसत नव्हते. यादरम्यान ब्रायन लाराने धोनीशी बराच वेळ चर्चा केली आणि त्यानंतर धोनी पॅवेलियनमध्ये परतला.

इंग्लंडमध्ये धोनीला शतक करता आले नाही पण त्याने कसोटीत अनेक जबरदस्त खेळी खेळल्या. पहिल्याच दौर्यावर त्याने असाच एक डाव खेळला. 2007 मध्ये लॉर्ड्स कसोटीत त्याने नाबाद 76 धावा करून भारताला पराभवापासून वाचवले. भारताला विजयासाठी 380 धावांचे लक्ष्य मिळाले होते. प्रत्युत्तराच्या अखेरच्या दिवशी भारताने 231 धावांत 6 गडी गमावले होते.. नजरा फक्त धोनीवर होत्या. धोनीला साथ देण्यासाठी तळाचे फलंदाज बाकी होते. अशा परिस्थितीत धोनीने डावाची सूत्रे हातात घेऊन भारताला पराभवापासून वाचवलं. भारताची नववी विकेट 263 धावांवर पडली. सामना संपायला आणखी 6 ओव्हर बाकी होत्या... अशा परिस्थितीत त्याने श्रीशांतबरोबर 19 धावांची भागीदारी करत सामना वाचविला. धोनीने त्याच्या खेळीत 10 चौकार ठोकले. नंतर भारताने ही मालिका 1-0 ने जिंकली.

ऑक्टोबर 2008 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मोहाली कसोटीत धोनीने दोन्ही डावात अर्धशतके झळकावत आपल्या नेतृत्वाखाली भारताला विजय मिळवून दिला. या दरम्यान तो पहिल्या डावात आठव्या क्रमांकावर फलंदाजीला आला आणि 8 चौकार आणि 7 षटकारांसह 92 धावांवर तो बाद झाला. ही सौरव गांगुलीची शेवटची मालिका होती आणि त्यानेही मोहाली कसोटीच्या पहिल्या डावात शतक केलं होतं. दुसर्या डावात धोनी तिसऱ्या क्रमांकावर खेळण्यासाठी आला आणि 3 चौकार व 1 षटकारासह 68 धावा करून तो परतला. हा सामना भारताने 320 धावांनी जिंकला.