लॉर्ड्सवर करायचे सफाईचं काम, न्यूझीलंडला बनवलं वर्ल्ड चॅम्पियन; आता रणजी ट्रॉफीत मिळाली जबाबदारी
आंध्र प्रदेश क्रिकेट असोसिएशनने 2026-27 देशांतर्गत क्रिकेटपूर्वी एक मोठी घोषणा केली आहे. न्यूझीलंडचा सर्वात यशस्वी प्रशिक्षक असलेल्या गॅरी स्टीड याला आंध्र प्रदेश संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्त केलं आहे.

देशांतर्गत क्रिकेट पर्व 2026-2027 स्पर्धेसाठी आंध्र प्रदेश क्रिकेट असोसिएशनने एक मोठा निर्णय घेतला आहे. न्यूझीलंडच्या माजी दिग्गज आणि यशस्वी प्रशिक्षक असलेल्या गॅरी स्टीड याची मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्ती केली आहे. आंध्र प्रदेशच्या वरिष्ठ पुरूष संघाचा मुख्य प्रशिक्षक असणार आहे. (PHOTO CREDIT- GETTY)

गॅरी स्टीड 54 वर्षांचे असून 2018 ते जून 2025 पर्यंत न्यूझीलंडच्या वरिष्ठ संघाचे प्रशिक्षक होते. गॅरी स्टीडच्या मार्गदर्शनाखाली न्यूझीलंड क्रिकेट संघाने जागतिक स्तरावर ऐतिहासिक कामगिरी केली आहे. आता भारताच्या देशांतर्गत क्रिकेटमध्ये आपलं मार्गदर्शन देणार आहे. (PHOTO CREDIT- GETTY)

न्यूझीलंडने 2021 मध्ये भारताला आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियन्शिपमध्ये पराभूत करून जेतेपद मिळवलं होतं. तेव्हा गॅरी स्टीड हे न्यूझीलंड संघाचे प्रशिक्षक होते. तर स्टीडच्या मार्गदर्शनाखाली न्यूझीलंडने 2019 वनडे वर्ल्डकप, 2021 टी20 वर्ल्डकप आणि 2025 चॅम्पियन्स ट्रॉफीचा अंतिम सामना खेळला गेला. (PHOTO CREDIT- GETTY)

गॅरी स्टीडच्या मार्गदर्शनाखालीच न्यूझीलंडने कसोटीत भारतीय संघाला आपल्याच भूमीत 3-0 ने मात देत ऐतिहासिक विजय मिळवला होता. यापूर्वी गॅरी स्टीडच्या मार्गदर्शनाखाली महिला संघाने 2009 वनडे वर्ल्डकप आणि 2010 टी20 वर्ल्डकप स्पर्धेची अंतिम फेरी गाठली होती. (PHOTO CREDIT- GETTY)

गॅरी स्टीड आपल्या सुरूवातीच्या काळात लॉर्ड्स क्रिकेट ग्राउंडवर सफाई कर्मचारी म्हणून काम केलं आहे. 1990 मध्ये मैदानातील खिडक्या साफ करण्याचं काम करायचे. त्यानंतर त्यांनी न्यूझीलंड संघात स्थान मिळवलं. न्यूझीलंडसाठी 5 कसोटी सामन्यात 34.75 च्या सरासरीने 278 धावा केल्या. (PHOTO CREDIT- GETTY)