
भारताविरूद्धच्या वनडे आणि टी20 मालिकेपूर्वी ऑस्ट्रेलियाचा स्टार खेळाडू ग्लेन मॅक्सवेलला दुखापत झाली आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेपूर्वी सराव करताना मॅक्सवेलचा हात फ्रॅक्चर झाला. त्यामुळे न्यूझीलंडविरुद्ध तीन सामन्यांच्या टी20 मालिकेला मुकला आहे. (Photo_AFP)

ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड यांच्यातील टी20 मालिका सुरु झाली आहे. ही मालिका 4 ऑक्टोबर संपेल. त्यानंतर भारतीय संघाशी दोन हात करण्यास सज्ज होईल. या मालिकेत टीम इंडियाला तीन एकदिवसीय आणि पाच टी20 सामने खेळायचे आहेत. (Photo- PTI)

मिडिया रिपोर्टनुसार, भारताविरूद्धच्या पाच सामन्यांच्या टी20 मालिकेत ग्लेन मॅक्सवेल खेळणार नाही. कारण त्याची दुखापत बरी होण्यास वेळ लागणार आहे. त्यामुळे ऑस्ट्रेलियाच्या गोटात चिंतेचं वातावरण आहे. (Photo- PTI)

भारत आणि ऑस्ट्रेलिया टी20 मालिका 2 नोव्हेंबरला संपेल. या मालिकेनंतर ऑस्ट्रेलियन संघ टी20 वर्ल्डकपसाठी भारतात येईल. ग्लेन मॅक्सवेल तिथपर्यंत बरा झाला तर ठीक नाही तर टी20 वर्ल्डकप स्पर्धेला मुकावं लागेल. (Photo- PTI)

न्यूझीलंड मालिकेसाठी ऑस्ट्रेलियाचा टी20 संघ: मिचेल मार्श (कर्णधार), शॉन अॅबॉट, झेवियर बार्टलेट, टिम डेव्हिड, बेन द्वारशुइस, जोश हेझलवूड, ट्रॅव्हिस हेड, जोश इंग्लिस (यष्टीरक्षक), मॅट कुहनेमन, मिचेल ओवेन, मॅथ्यू शॉर्ट, मार्कस स्टोइनिस, एडम झांपा, ग्लेन मॅक्सवेल (अनुपलब्ध). ( Photo: PTI/AFP)