GT vs RR : मोहम्मद सिराजचा आयपीएलमध्ये विक्रम, नोंदवला असा विक्रम

गुजरात टायटन्सने इंडियन प्रीमियर लीग 2025 स्पर्धेतील 23वा सामना जिंकला. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना गुजरात टायटन्सने 20 षटकांत 217 धावा केल्या, तर राजस्थान रॉयल्सचा संघ 159 धावांवर ऑलआउट झाला. मोहम्मद सिराजने या सामन्याच्या पॉवरप्लेमध्ये सर्वोत्तम कामगिरी केली आहे.

| Updated on: Apr 10, 2025 | 4:39 PM
1 / 5
आयपीएलच्या 18 व्या पर्वात मोहम्मद सिराजच्या भेदक गोलंदाजीचं दर्शन घडत आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि सनरायझर्स हैदराबाद विरूद्धच्या सामन्यात तर सामनावीराचा पुरस्कार जिंकला. तर राजस्थान रॉयल्स विरुद्धही चांगली गोलंदाजी केली.

2 / 5
अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना गुजरात टायटन्सने 20 षटकांत 217 धावा केल्या. या लक्ष्याचा पाठलाग करताना मोहम्मद सिराजने राजस्थान रॉयल्सला सुरुवातीलाच धक्का दिला. त्याने 4 षटकांत 30 धावा देत 1 बळीही घेतला.

3 / 5
या विकेटसह मोहम्मद सिराजने या वर्षीच्या आयपीएलमध्ये पॉवरप्लेमध्ये सर्वाधिक विकेट घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत अव्वल स्थान पटकावले आहे. सिराजने 5 सामन्यांमध्ये पॉवरप्लेमध्ये गोलंदाजी केली आणि आतापर्यंत 7 विकेट्स घेतल्या. गुजरात टायटन्स संघाला चांगली सुरुवात देण्यात सिराज महत्त्वाची भूमिका बजावत आहे.

4 / 5
या वर्षीच्या आयपीएलमध्ये सर्वाधिक डॉट बॉल टाकणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत मोहम्मद सिराज अव्वल स्थानावर आहे. आतापर्यंत 20 षटके टाकणाऱ्या सिराजने 68 चेंडूत एकही धाव दिलेली नाही हे आश्चर्यकारक आहे. याचा अर्थ त्याने 120  पैकी फक्त 52 चेंडूत धावा दिल्या.

5 / 5
20 षटकांमध्ये फक्त 7.70  च्या सरासरीने धावा देणाऱ्या मोहम्मद सिराजने एकूण 10 विकेट्सही घेतल्या आहेत. तसेच ऑरेंज कॅप रेसमध्येही आहे. यावर्षीच्या आयपीएलमध्ये नव्या उत्साहाने गोलंदाजी करणारा सिराज गुजरात टायटन्स संघाचा ट्रम्प कार्ड बनला आहे.