IPL 2027 स्पर्धेपूर्वी घडामोडींना वेग, हार्दिक पांड्या राजस्थान रॉयल्स नाही तर या संघाकडून खेळणार!

आयपीएल 2026 स्पर्धा हार्दिक पांड्यासाठी एक वाईट स्वप्न ठरलं आहे. या स्पर्धेत त्याच्या नेतृत्वात मुंबई इंडियन्सने सुमार कामगिरी केली. त्यामुळे हार्दिक पांड्याला रिलीज करणार असणार असल्याच्या बातम्यांना उधाण आलं आहे. रिपोर्टनुसार, हार्दिक पांड्याला केकेआरमध्ये एन्ट्री मिळू शकते.

| Updated on: Jun 23, 2026 | 9:07 PM
1 / 5
हार्दिक पांड्याने 2024पासून मुंबई इंडियन्सचं नेतृत्व केलं. पण तिन्ही पर्वात जेतेपद काही मिळवू शकला नाही. दोन पर्वात तर मुंबई इंडियन्सची कामगिरी सुमार राहिली आहे. अशा स्थितीत हार्दिक पांड्याचं मुंबईतून बाहेर पडणं जवळपास निश्चित आहे. रिपोर्टनुसार हार्दिक पांड्याला ट्रेड करण्यासाठी मुंबई इंडियन्सला दोन ऑफर मिळाल्या आठहेत. यात पहिलं नाव राजस्थान रॉयल्स आणि दुसरं केकेआर संघाचं आहे. (Photo: PTI)

2 / 5
आयपीएलशी निगडीत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, केकेआर संघाचं टॉप व्यवस्थापन आणि मुंबई इंडियन्स संघाच्या मालकांमध्ये ट्रेडबाबत चर्चा झाली आहे. त्यामुळे या दोन फ्रेंचायझींमध्ये ट्रेड लवकरच फायनल होऊ शकते.  (Photo: PTI)

3 / 5
कोलकाता नाईट रायडर्स संघ नव्या कर्णधाराच्या शोधात आहे. अजिंक्य रहाणेकडे पुढच्या पर्वात नेतृत्व सोपवणं कठीण आहे. त्याला रिलीज केलं जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे केकेआरला नव्या नेतृत्वाची गरज आहे. त्यात उपकर्णधार रिंकु सिंह नेतृत्व करण्यास सक्षम दिसत नाही. त्यामुळे हार्दिक पांड्याकडे नेतृत्व सोपवलं जाण्याची शक्यता वाढली आहे.   (Photo: PTI)

4 / 5
राजस्थान रॉयल्स संघ देखील हार्दिक पांड्याला संघात घेण्याच्या तयारीत आहे. पण फ्रेंचायझीने आधीच संघाची धुरा रियान परागच्या खांद्यावर दिली आहे. त्यामुळे या संघात हार्दिक पांड्याला नेतृत्वाची संधी मिळणं कठीण आहे.  (Photo: PTI)

5 / 5
हार्दिक पांड्याने कर्णधारपद भूषवताना गुजरात टायटन्सला जेतेपद मिळवून दिलं आहे.  इतकंच काय तर दोनदा अंतिम फेरी गाठली आहे. पण एकदा उपविजेतेपदावर समाधान मानावं लागलं. पण त्यानंतर मुंबई इंडियन्स नेतृत्व करण्यात अपयशी ठरला.  (Photo: PTI)

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us