हरमनप्रीत कौरने अबाधित विक्रम अखेर मोडला, ऑस्ट्रेलियन फलंदाजाला एका धावेने टाकलं मागे

वुमन्स वनडे वर्ल्डकप स्पर्धेचा विजेता कोण ठरणार हे लवकरच स्पष्ट होईल. तत्पूर्वी भारतीय कर्णधार हरमनप्रीत कौरने एक मोठा विक्रम आपल्या नावावर केला आहे. काय हा विक्रम ते जाणून घ्या.

| Updated on: Nov 02, 2025 | 10:27 PM
1 / 5
वुमन्स वनडे वर्ल्डकप स्पर्धेच्या अंतिम फेरीत भारताने दक्षिण अफ्रिकेसमोर विजयासाठी 299 धावांचं आव्हान ठेवलं आहे. त्यामुळे आता भारतीय गोलंदाजांचा कस लागणार आहे. असं असताना हरमनप्रीत कौर अंतिम फेरीत काही खास फलंदाजी करू शकली नाही. पण तिने एक मोठा विक्रम मोडीत काढला आहे. (फोटो-बीसीसीआय ट्वीटर)

2 / 5
भारतीय कर्णधार हरमनप्रीत कौर फलंदाजीसाठी उतरली तेव्हा टीम इंडियाने 166 धावांवर दोन विकेट गमावल्या होत्या. त्यामुळे हरमनप्रीत कौरकडून चांगल्या खेळीची अपेक्षा होती. मात्र तिने 29 चेंडूत 20 धावा केल्या आणि बाद झाली. (फोटो- Getty Images)

3 / 5
हरमनप्रीत कौरच्या छोट्या खेळीमुळे तिचे चाहते नाराज झाले. पण हरमनप्रीत कौरने एक मोठा विश्वविक्रम मोडला. तिने आयसीसी महिला एकदिवसीय विश्वचषकाच्या इतिहासात बाद फेरीच्या सामन्यात सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम रचला आहे. (फोटो-बीसीसीआय ट्वीटर)

4 / 5
हरमनप्रीत कौरने माजी ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू बेलिंडा क्लार्कचा विक्रम मोडीत काढला आहे. तिने सहा डावांमध्ये 330 धावा केल्या होत्या. हरमनप्रीत कौर आता चार डावांमध्ये सर्वाधिक धावा करणारी खेळाडू ठरली आहे. (फोटो- पीटीआय)

5 / 5
हरमनप्रीतने 9 सामन्यांच्या 8 डावांमध्ये 260 धावा केल्या. तिने जवळपास 33 च्या सरासरीने या धावा केल्या आहेत. या स्पर्धेत हरमनप्रीत कौरने दोन अर्धशतकेही झळकावली आहेत. (फोटो-बीसीसीआय ट्वीटर)