बीसीसीआयने बंदी घातली, त्याच खेळाडूकडे कर्णधारपदाची धुरा! टी20 वर्ल्ककपची जबाबदारी

आयपीएलमधून दोन वर्षांसाठी बंदी घालण्यात आलेल्या हॅरी ब्रूकची इंग्लंडच्या एकदिवसीय आणि टी-२० संघांच्या कर्णधारपदी नियुक्ती करण्यात आली आहे. राजीनामा दिलेल्या जोस बटलरच्या जागी ब्रूकची नियुक्ती करण्यात आली आहे.

| Updated on: Apr 07, 2025 | 6:49 PM
1 / 6
आयपीएलमधून दोन वर्षांसाठी बंदी घालण्यात आलेला इंग्लंडचा युवा फलंदाज हॅरी ब्रूक याला इंग्लंडच्या एकदिवसीय आणि टी20 संघांचा कर्णधार म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. ब्रूकने जोस बटलरची जागा घेतली आहे. पाकिस्तानमध्ये झालेल्या आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीत संघाच्या खराब कामगिरीनंतर बटलरने कर्णधारपद सोडलं होतं.

2 / 6
जानेवारी 2022 पासून इंग्लंड संघात खेळणारा ब्रूक हा महत्त्वाचा खेळाडू आहे. इंग्लंडच्या सर्वोत्तम फलंदाजांपैकी एक म्हणून त्याची गणना होते. आयसीसी कसोटी क्रमवारीतही ब्रूक गेल्या वर्षभरापासून दुसऱ्या क्रमांकावर आहे. यापूर्वी इंग्लंडच्या वनडे आणि टी20 संघाचा उपकर्णधार म्हणून खेळत होता.

3 / 6
2018 मध्ये न्यूझीलंडमध्ये झालेल्या आयसीसी अंडर 19 विश्वचषकात ब्रूकने इंग्लंडचे नेतृत्व केले. ब्रुक इंग्लंडसाठी 26 एकदिवसीय आणि 44 टी20  सामने खेळले आहेत. त्याने यामध्ये चांगली कामगिरी केली आहे.

4 / 6
इंग्लंड संघाचे कर्णधारपद मिळाल्याबद्दल आनंद व्यक्त करताना ब्रूक म्हणाला, "मला हा सन्मान स्वीकारताना खूप आनंद होत आहे.आगामी टी20 विश्वचषक आणि विश्वचषकात इंग्लंडला चॅम्पियन बनवण्याचा मी प्रयत्न करेन. इंग्लंडचा व्हाईट-बॉल कर्णधार असणे हा खरोखरच सन्मान आहे."

5 / 6
"येत्या काळात संघाला विश्वचषक आणि मोठ्या स्पर्धा जिंकण्यास मदत करण्यासाठी मी कठोर परिश्रम करण्यास तयार आहे," असं ब्रूक म्हणाला.

6 / 6
इंग्लंड मे 2025 च्या अखेरीस वेस्ट इंडिजविरुद्धच्या घरच्या मालिकेने व्हाईट बॉल मोहिमेची सुरुवात करेल. यात तीन एकदिवसीय आणि तीन टी20  सामने असतील. ब्रुकच्या नेतृत्वाखालील संघाची ही पहिलीच मालिका असेल. (सर्व फोटो- टीव्ही 9 कन्नड)