हरारेच्या मैदानात अजब नजारा! तब्बल 39 वर्षांनंतर ऑस्ट्रेलियन फलंदाजासोबत घडलं असं काही

ऑस्ट्रेलिया झिम्बाब्वे यांच्यात वनडे मालिकेतील पहिला सामना आहे. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने 294 धावांचं लक्ष्य झिम्बाब्वेसमोर ठेवलं आहे. या सामन्यात ओलिवर पीक 30 धावा करून बाद झाला. पण तो ज्या पद्धतीने बाद झाला, तो एक रेकॉर्ड ठरला आहे.

| Updated on: Sep 15, 2026 | 7:28 PM
1 / 5
झिम्बाब्वेविरुद्धच्या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा युवा फलंदाज ऑलिव्हर पीक 40 चेंडूंमध्ये 30 धावा करून बाद झाला. मात्र, तो 'हिट-विकेट' पद्धतीने बाद झाला असून, एकदिवसीय क्रिकेटच्या इतिहासात तब्बल 39 वर्षांनंतर एखादा ऑस्ट्रेलियन फलंदाज अशा प्रकारे बाद झाला आहे. (PC-GETTY IMAGES)

झिम्बाब्वेविरुद्धच्या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा युवा फलंदाज ऑलिव्हर पीक 40 चेंडूंमध्ये 30 धावा करून बाद झाला. मात्र, तो 'हिट-विकेट' पद्धतीने बाद झाला असून, एकदिवसीय क्रिकेटच्या इतिहासात तब्बल 39 वर्षांनंतर एखादा ऑस्ट्रेलियन फलंदाज अशा प्रकारे बाद झाला आहे. (PC-GETTY IMAGES)

2 / 5

झिम्बाब्वेचा डाव्या हाताचा वेगवान गोलंदाज न्यूमॅन न्यामहुरी याच्या चेंडूचा सामना करताना ऑलिव्हर पीकचा पिछाडीचा पाय चुकून थेट स्टंप्सवर जाऊन लागला. त्यामुळे बेल्स खाली पडल्या आणि त्याला हिट-विकेट घोषित करण्यात आले. (PC-GETTY IMAGES)

3 / 5

एकदिवसीय क्रिकेटच्या इतिहासात हिट-विकेट होणारा ऑलिव्हर पीक हा केवळ पाचवा ऑस्ट्रेलियन फलंदाज ठरला आहे. यापूर्वी 1987 मध्ये महान फलंदाज अ‍ॅलन बॉर्डर वेस्ट इंडिजविरुद्ध अशा प्रकारे बाद झाले होते. बॉर्डर हे वनडेमध्ये दोनदा हिट-विकेट होणारे एकमेव ऑस्ट्रेलियन आहेत. (PC-GETTY IMAGES)

4 / 5

ऑस्ट्रेलियाचे दिग्गज कर्णधार स्टीव्ह वॉ हे देखील आपल्या कारकिर्दीत एकदिवसीय सामन्यात हिट-विकेट झाले आहेत. 1987 मध्ये मेलबर्न येथे वेस्ट इंडिजविरुद्ध खेळताना ते बाद झाले होते. त्यानंतर आता 39 वर्षांनी ऑलिव्हर पीकच्या रूपाने या नकोशा रेकॉर्डची पुनरावृत्ती झाली आहे. (PC-GETTY IMAGES)

5 / 5

एकदिवसीय क्रिकेटच्या इतिहासात सर्वात पहिले हिट-विकेट होण्याचा रेकॉर्ड वेस्ट इंडिजच्या रॉय फ्रेडरिक्स यांच्या नावावर आहे. 21 जून 1975 रोजी लॉर्ड्स मैदानावर ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळताना डेनिस लिलीच्या चेंडूवर हुक शॉट मारण्याच्या नादात ते हिट-विकेट झाले होते. (PC-GETTY IMAGES)

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us