
आयपीएल 2026 स्पर्धेपूर्वी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने 17 खेळाडूंना कायम ठेवलं आहे. तर 8 खेळाडूंना रिलीज केलं आहे. आता आरसीबी मिनी लिलावात किती आणि कोणते प्लेयर्स खरेदी करते याकडे लक्ष असेल. (Photo: IPL/RCB/TV9 Kannad वरून)

आरसीबीने लियाम लिव्हिंगस्टोन, मयंक अग्रवाल, टिम सेफर्ट, ब्लेसिंग मुझारबानी, स्वस्तिक चिकारा, मनोज भंडागे, मोहित राठी, लुंगी न्गीडी या आठ खेळाडूंना सोडलं आहे. त्यामुळे आरसीबीच्या पर्समध्ये 16.40 कोटी रुपये शिल्लक राहिले आहेत. (Photo: IPL/RCB/TV9 Kannad वरून)

आरसीबी आयपीएलच्या मिनी लिलावात 16.40 कोटी रुपयांसह सहभागी होईल. या रकमेतून रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू फ्रँचायझी एकूण 8 खेळाडू खरेदी करू शकते. आयपीएलच्या नियमांनुसार, एका संघात जास्तीत जास्त 25 खेळाडू असू शकतात. (Photo: IPL/RCB/TV9 Kannad वरून)

आरसीबीकडे फक्त 6+2 जागा शिल्लक आहेत. आयपीएलच्या नियमांनुसार, एका संघात फक्त 8 परदेशी खेळाडूंना परवानगी आहे. आरसीबीकडे आधीच फिल साल्ट, जोश हेझलवूड, नुवान तुषारा, टिम डेव्हिड, रोमारियो शेफर्ड आणि जेकब बेथेल परदेशी खेळाडू आहेत. आरसीबीला लिलावाद्वारे फक्त दोन परदेशी खेळाडू खरेदी करण्याची परवानगी आहे. (Photo: IPL/RCB/TV9 Kannad वरून)

रॉयल चॅलेंजर्स बंगलुरु: विराट कोहली, रजत पाटीदार, फिल सॉल्ट, जॉश हेझलवुड, जितेश शर्मा, क्रुणाल पंड्या, भुवनेश्वर कुमार, सुयश शर्मा, रोमारियो शेफर्ड, टिम डेविड, देवदत्त पडिक्कल, जैकब बॅथेल, स्वप्निल सिंह, रसिख सलाम, यश दयाल, नुवान तुषारा आणि अभिनंदन सिंह. (Photo: IPL/RCB/TV9 Kannad वरून)